‘हेच पतीने केलं असतं तर..’; बिग बॉसच्या स्पर्धकासोबत अंकिताचा रोमँटिक डान्स पाहून भडकले नेटकरी

बिग बॉसच्या घराबाहेर पडताच अभिनेत्री अंकिता लोखंडेनंही पार्टी करण्यास सुरुवात केली आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती बिग बॉसमधील सहस्पर्धक नाविद सोलसोबत रोमँटिक डान्स करताना दिसतेय. त्यावरून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

हेच पतीने केलं असतं तर..; बिग बॉसच्या स्पर्धकासोबत अंकिताचा रोमँटिक डान्स पाहून भडकले नेटकरी
Ankita Lokhande and Navid Sole
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 31, 2024 | 8:40 AM

मुंबई : 31 डिसेंबर 2024 | ‘बिग बॉस 17’च्या टॉप 5 मध्ये पोहोचल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेचा प्रवास संपला. चौथ्या स्थानी ती बाद झाली. घरातून बाहेर पडल्यानंतर तिने तिच्या मित्रमैत्रिणींसोबत पार्टी करण्यास सुरुवात केली आहे. अंकिता आणि तिचा पती विकी जैन हे शोमधील सर्वांत स्ट्राँग स्पर्धक होते. मात्र दोघांमध्ये कोणीच टॉप 3 पर्यंत पोहोचू शकला नाही. अंकिताच्या आधी विकी शोमधून बाहेर पडला होता. त्यानंतर त्यानेही बिग बॉसमधल्या मैत्रिणींसोबत पार्टी केली. आता अंकिताने घरातून बाहेर पडल्यानंतर जोरदार पार्टी केली आङे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता ‘बिग बॉस 17’मधील सहस्पर्धक नाविद सोलसोबत रोमँटिक डान्स करताना दिसतेय. मात्र तिचा हा अंदाज अनेकांना आवडला नाही. यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये नाविद आणि अंकिता ‘तुम क्या मिले’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा डान्स नंतर इतका रोमँटिक होते, की अंकिता नाविदला किससुद्धा करते. खूपच मजा-मस्ती करत हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. मात्र अनेकांना अंकिताचा हा अंदाज अजिबात आवडला नाही. बिग बॉसच्या घरात जेव्हा जेव्हा विकी आणि इतर महिला स्पर्धक जवळ यायचे, तेव्हा अनेकदा अंकिता त्याच्याकडे तक्रार करायची. आता स्वत: तसंच काही करत असल्याने नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

‘हेच जर विकीने एखाद्या महिला स्पर्धकासोबत केलं असतं तर’, असा सवाल एकाने केला. तर ‘यालाच डबल ढोलकी म्हणतात. जेव्हा विकी आणि मन्नारा एकमेकांशी फक्त बोलायचे, तेव्हा सर्वांत जास्त त्रास हिलाच व्हायचा’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे. ‘खुद करे तो रासलीला और पती करे तो कॅरेक्टर ढिला’ अशाही शब्दांत नेटकऱ्यांनी अंकिताला फटकारलं आहे. बिग बॉसच्या घरात अंकिताला अनेकदा पतीकडे तक्रार करताना पाहिलं गेलंय. विकी जेव्हा जेव्हा इतर महिला स्पर्धकांसोबत बोलायचा, तेव्हा अंकिताच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडणंसुद्धा झाली होती.

ऑक्टोबर महिन्यात अंकिता आणि तिचा पती विकी जैन हे दोघं ‘बिग बॉस 17’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले. बिग बॉसच्या पहिल्या दिवसापासून या दोघांच्या नात्याची वेगळी बाजू प्रेक्षकांना पहायला मिळाली. अंकिता आणि विकी यांच्यात सतत भांडणं झाली. त्यानंतर जेव्हा विकीची आई रंजना जैन बिग बॉसच्या घरात आल्या, तेव्हा सासू-सुनेतील वेगळं समीकरण प्रेक्षकांना पहायला मिळालं. इतकंच नव्हे तर बिग बॉसनंतर अंकिता आणि विकी विभक्त होणार की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.