
मुंबई : बिग बाॅस 17 मध्ये मोठे हंगामे होताना दिसत आहे. बिग बाॅसच्या घरात अंकिता लोखंडे ही धक्कादायक खुलासे करताना दिसत आहे. अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याला म्हणते की, माझी तब्येत गेल्या काही दिवसांपासून सतत खराब होतंय. मला इथे अजिबात चांगले वाटत नाहीये. मला पीरियड्स पण येत नाहीयेत. अंकिताचे हे बोलणे सुरू असतानाच विकी म्हणतो की, तू कालच म्हणाली ना तुला पीरियड्स आले म्हणून. लगेचच अंकिता लोखंडे ही रागात येते आणि म्हणते की, मी तुला पीरियड्स नाही आले हे काल सांगितले.
पुढे अंकिता म्हणते की, मी खूप जास्त त्रस्त असून मला काहीच चांगले वाटत नाहीये. अंकिता थेट म्हणते की, मला वाटतंय की, मी प्रेग्नेंट आहे. माझ्या पोटात नेमके काय आहे हे मला जाणून घ्यायचे असल्याचे देखील सांगताना अंकिता लोखंडे ही दिसत आहे. बिग बाॅसकडून अंकिता लोखंडे हिची ब्लड टेस्ट आणि यूरिन टेस्ट करण्यात आलीये.
इतकेच नाही तर अंकिता लोखंडे हिची प्रेग्नेंसी टेस्ट देखील करण्यात आली. मात्र, त्याचा रिपोर्ट येणे अजून शिल्लक आहे. मात्र, अंकिता यापूर्वी देखील घरात अनेकदा थेट मला आंबट खाऊ वाटत असल्याचे सांगताना दिसली होती. यानंतर सर्वांनीच तिला प्रेग्नेंट आहेस का असा थेट सवाल देखील केला होता. आता त्यामध्ये अंकिता लोखंडे हिने विकीला हे सर्वकाही सांगितले आहे.
ज्यावेळी अंकिता ही विकी जैन याला प्रेग्नेंसीबद्दल बोलताना दिसली. त्यावेळी विकी जैन हा फार जास्त उत्साही नक्कीच दिसला नाही किंवा त्याला फार काही आनंदीही झाला नाही. त्याचे बोलणे अत्यंत नाॅर्मल दिसले. यामुळेच आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. खरोखरच अंकिता लोखंडे ही प्रेग्नेंट आहे का? असाही प्रश्न सातत्याने चाहत्यांकडून विचारला जात आहे.
बिग बाॅस 17 मध्ये अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्यामध्ये मोठे वाद हे होताना दिसत आहेत. अंकिता लोखंडे हिने पती विकी जैन याच्यावर अनेक थेट गंभीर आरोप हे लावले आहेत. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामधील वाद हा वाढताना दिसतोय. आता थेट अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत प्रेग्नेंसीबद्दल बोलताना दिसली आहे.