Aaliyah Kashyap | कोण आहे अनुराग कश्यपचा होणारा जावई? 22 वर्षीय आलियाशी करणार लग्न

आलियासोबतच शेनसुद्धा काही वेळा भारतात आला आहे. अनुराग कश्यपची मुलगी आलिया ही व्लॉगर आहे. युट्यूबवर ती नेहमीच तिचे व्हिडीओ पोस्ट करत असते. आलिया आणि शेनच्या लव्हस्टोरीची सुरुवात एका डेटिंग ॲपद्वारे झाली होती.

Aaliyah Kashyap | कोण आहे अनुराग कश्यपचा होणारा जावई? 22 वर्षीय आलियाशी करणार लग्न
Anurag Kashyap daughter
Image Credit source: Instagram
| Updated on: May 21, 2023 | 10:07 AM

मुंबई : निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप हिने नुकताच साखरपुड्याचा फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. बॉयफ्रेंड शेन ग्रेगॉइरसोबत लिपलॉप आणि डायमंड अंगठीचा फोटो पोस्ट करत आलियाने ही आनंदाची बातमी सांगितली. 22 वर्षीय आलिया सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. गेल्या काही वर्षांपासून ती शेनला डेट करतेय. बालीमध्ये शेनने आलियाला प्रपोज केलं असून या प्रपोजलचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो पोस्ट केले आहेत. यातील पहिल्या फोटोमध्ये ती तिची डायमंड रिंग दाखवताना दिसतेय. तर दुसऱ्या फोटोमध्ये आलिया आणि शेन लिपलॉप करत आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये आलियाने लिहिलं, ‘अखेर हे घडलं. माझा जिवलग मित्र, माझा जोडीदार, माझा सोबती आणि आता माझा होणारा पती. तू माझ्या आयुष्यातील खरं प्रेम आहे. खरं आणि बिनशर्त प्रेम कसं करावं हे मला तुझ्याकडून शिकायला मिळालं. तुला होकार देणं ही माझ्यासाठी आजपर्यंतची सर्वांत सोपी गोष्ट होती. तुझ्यासोबत मी उर्वरित आयुष्य घालवण्यासाठी खूपच उत्सुक आहे.’ आलिया या फोटोंवर नेटकऱ्यांसोबतच सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शनाया कपूर, जान्हवी कपूर, अदिती भाटिया, सनी लिओनी यांनी कमेंट तर आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत.

कोण आहे अनुराग कश्यपचा होणारा जावई?

अनुराग कश्यपचा होणारा जावई शेन ग्रेगॉइर हा 23 वर्षांचा आहे. तो अमेरिकन उद्योजक आहे. रॉकेट पॉवर्ड साऊंड या नावाच्या कंपनीचा तो संस्थापक आहे. ही एक सॉफ्टवेअर कंपनी आहे जी साऊंड डिझाइनिंग आणि म्युझिक प्रॉडक्शन स्किल डेव्हलपमेंट करते. आलिया सोशल मीडियावर नेहमीच शेनसोबतचे फोटो पोस्ट करताना दिसते. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. आलियासोबतच शेनसुद्धा काही वेळा भारतात आला आहे. अनुराग कश्यपची मुलगी आलिया ही व्लॉगर आहे. युट्यूबवर ती नेहमीच तिचे व्हिडीओ पोस्ट करत असते. आलिया आणि शेनच्या लव्हस्टोरीची सुरुवात एका डेटिंग ॲपद्वारे झाली होती.