AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Rajput | 2 वर्षांनंतर अनुराग कश्यपने सुशांतबद्दलचे ‘ते’ व्हॉट्स ॲप चॅट्स केले जाहीर, म्हणाला I am sorry

अनुरागने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर व्हॉट्स ॲप चॅट्सचा स्क्रीनशॉटसुद्धा शेअर केला आहे. सुशांतच्या मृत्यूच्या तीन आठवड्यांपूर्वी त्याच्या मॅनेजरसोबत झालेल्या संवादाचा हा स्क्रीनशॉट आहे.

Sushant Singh Rajput | 2 वर्षांनंतर अनुराग कश्यपने सुशांतबद्दलचे 'ते' व्हॉट्स ॲप चॅट्स केले जाहीर, म्हणाला I am sorry
Anurag Kashap and Sushant Singh RajputImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 29, 2023 | 6:43 PM
Share

मुंबई: दिग्दर्शक अनुराग कश्यप नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. सुशांतकडे दुर्लक्ष केल्याची खंत त्याने व्यक्ती केली. अनुरागने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर व्हॉट्स ॲप चॅट्सचा स्क्रीनशॉटसुद्धा शेअर केला आहे. सुशांतच्या मृत्यूच्या तीन आठवड्यांपूर्वी त्याच्या मॅनेजरसोबत झालेल्या संवादाचा हा स्क्रीनशॉट आहे. सुशांतच्या मृत्यूच्या दोन वर्षांनंतर अनुरागने हे चॅट्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सुशांतने मृत्यूच्या तीन आठवड्यांआधी अनुराग कश्यपशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी अनुरागने नकार दिला. कारण सुशांतसोबत त्याचा अनुभव चांगला नव्हता. “मी रागाच्या भरात व्यक्त व्हायचो हे समजायला मला दीड वर्षांचा अवधी लागला. त्यावेळी मी काही पावलं मागे गेलो आणि मला ज्या गोष्टी खुपत होत्या त्यांचा विचार केला. तेव्हापासून माझ्या स्वभावात बरेच बदल झाले आहेत आणि त्यात कोणतंच फिल्टर नाही. मला हे आता कळालंय की प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायची गरज नसते”, असं अनुराग या मुलाखतीत म्हणाला.

अनुरागने शेअर केलेल्या व्हॉट्स ॲप चॅट्सच्या या स्क्रीनशॉटमध्ये त्याचा आणि मॅनेजरमध्ये झालेला संवाद पहायला मिळतोय. ‘मला माफ करा की मी हे आता करतोय. हे चॅट सुशांतच्या मृत्यूच्या तीन आठवड्यांपूर्वीचे आहेत. 22 मे रोजी मी त्याच्या मॅनेजरसोबत हे चॅट केलं होतं. आतापर्यंत हा स्क्रीनशॉट शेअर केला नव्हता, पण आता शेअर करण्याची गरज आहे असं वाटलं. होय, मला त्याच्यासोबत काम करायचं नव्हतं आणि त्यामागे माझी काही कारणं होती’, असं त्याने या स्क्रीनशॉटच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

2020 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत अनुरागने सांगितलं होतं की यशराज फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत काम करण्यासाठी सुशांतने त्याचा चित्रपट नाकारला होता. त्यावेळी त्याने खुलासा केला होता की सुशांतने अनुरागच्या चित्रपटाला नकार देत ‘शुद्ध देसी रोमान्स’ हा चित्रपट साइन केला होता. “या इंडस्ट्रीतील प्रत्येक आऊटसाइडर अभिनेत्याला यशराज फिल्म्सचं प्रमाणीकरण हवं असतं. सुशांतचंही असंच होतं, त्यामुळे मला त्याच्याकडून कोणतीच तक्रार नाही”, असं अनुराग म्हणाला होता.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.