Anushka Pimputkar : मराठी अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, संताप व्यक्त करत म्हणाली, इतकं घाण…

Anushka Pimputkar On Viral Video : मराठी अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरनं सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

| Updated on: Nov 21, 2026 | 6:07 PM
1 / 5
मराठी अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्या व्हिडिओमध्ये एक पुरुष मुद्दाम तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. मात्र, हा व्हिडिओ 'जनक' या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी तयार करण्यात आलेला होता.

मराठी अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्या व्हिडिओमध्ये एक पुरुष मुद्दाम तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. मात्र, हा व्हिडिओ 'जनक' या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी तयार करण्यात आलेला होता.

2 / 5

अभिनेत्रीचा हा व्हिडिओ अर्धाच पोस्ट करण्यात आला असून तोच व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावर आता अनुष्कानं संताप व्यक्त करत व्हिडिओ काढून टाकण्याची मागणी केली आहे.

3 / 5

अनुष्का म्हणतेय की, 'मी हा व्हिडिओ यासाठी बनवतेय, कारण दोन दिवसांपासून माझी एक क्लिप प्रचंड व्हायरल होतेय. पण, ती मूळ क्लिप 'जनक' या सिनेमासाठी मी तयार केलेली. आम्ही सिनेमाच्या प्रमोशनसाठी तो व्हिडिओ बनवलेला.'

4 / 5

'व्हिडिओच्या शेवटी सिनेमाबद्दल माहिती दिलेली. तो व्हिडिओ इतक्या लोकांनी व्हायरल केला की, त्यांनी ते शेवटची सिनेमाबद्दलची माहिती काढून फक्त व्हिडिओ पोस्ट केलाय आणि तो व्हायरल झालाय. हे खूप चुकीचं आहे.'

5 / 5

'आमचा 'जनक' हा सिनेमा यावरच आधारित आहे आणि मी आता ते खऱ्या आयुष्यातही अनुभवतेय. मला त्या व्हायरल व्हिडिओच्या कमेंट्स वाचून इतकं घाण वाटलं की, तुम्ही एखाद्याची अशी बदनामी कशी करू शकता. तो व्हिडिओ कृपया डिलीट करा, एवढीच मी विनंती करते. धन्यवाद!' असं अभिनेत्रीनं शेवटी म्हटलंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us