
AR Rahman Birthday : गायक आणि संगीतकार एआर रेहमान यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही… बॉलिवूडसाठी आतापर्यंत अनेक गाणी तयार केली आणि गायली आहेत… रेहमान यांनी त्यांच्या आवाजाने रसिकांवर जादू केली… आज त्यांचा आवजच त्यांची सर्वात मोठी ओळख आहे… पण रेहमान फक्त त्यांच्या प्रोफेशल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिले… आता मुस्लिम धर्मा माननारे रेहमान आधी हिंदू होते… तर त्यांनी हिंदू असताना मुस्लिम धर्म का स्वीकारला याबद्दल जाणून घेऊ…
ए.आर. रेहमान यांचा जन्म 6 जानेवारी 1967 रोजी तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे झाला. आज 59 वर्षांचे होणारे रहमान यांचा जन्म एका हिंदू कुटुंबात झाला. त्यांचं नाव दिलीप कुमार असं होतं. पण नंतर त्यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या ज्यामुळे रेहमान यांच्या आयुष्यातील अनेक घटना बदलल्या. त्यानंतर त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.
एका मुलाखतीत एआर रेहमान यांनी मोठा खुलासा केलेला. त्यांचे वडील कर्करोगाशी झुंजत होते आणि त्यांच्या शेवटच्या काळात एका सूफी संताने त्यांच्यावर उपचार केले. काही वर्षांनंतर, जेव्हा रहमान सूफी संतांना भेटले, तेव्हा त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने इस्लाम धर्म स्वीकारला. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर दिलीप कुमार अल्लाह रक्खा रेहमान झाले… रेहमान यांनी असं देखील सांगितलं की, एआर रेहमान हे नाव एका हिंदू ज्योतिषाकडून मिळालं होतं.
एका मुलाखतीदरम्यान, ए.आर. रहमान यांनी खुलासा केला की संगीत क्षेत्रात प्रवेश करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. त्याऐवजी, त्यांना कंप्यूटर इंजीनियर व्हायचं होतं. पण, नशिबात जे लिहिलं आहे ते होतंच… रेहमान यांनी 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या, ‘रोजा’ सिनेमातून करियरची सुरुवात केली… आज एआर रेहमान हे संगीत विश्वातील मोठे दिग्गज आहेत.
रेहमान आणि सायरा यांनी 1995 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना खतिजा, रहीमा आणि अमीन ही तीन मुलं आहेत. घटस्फोटाच्या निर्णयानंतर रेहमान यांच्यावर बरीच टीका झाली. ए. आर. रेहमान यांनी लग्नाच्या 29 वर्षांनंतर पत्नी सायरा बानूसोबत घटस्फोट घेत असल्याचं जाहीर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला.