
Arjun Tendulkar and Saania Chandhok Marriage: भारतीय क्रिकेट संघाचे माजी स्टार फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचं लग्न झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अंर्जुन आणि सानिया यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अर्जुन आणि सानिया यांच्या लग्नात बॉलिवूड सेलिब्रिटी, उद्योजक, क्रिकेट अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती… अभिनेता शाहरुख खान देखील पत्नी गौरी खान आणि लेक सुहाना खान यांच्यासोबत पोहोचला. तर पाहुण्यांच्या गर्दीत अभिनेता आमिर खान याला किंग खान याच्यासोबत बोलताना स्पॉट करण्यात आलं… सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त शाहरुख आणि त्याच्या कुटुंबाच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
अर्जुन याच्या लग्नात शाहरुख खान याने पारंपरिक लूकमध्ये एन्ट्री केली. तर आमिर खान याने लाल रंगाच्या कुर्त्याला पसंती दिली… लग्नाच्या हॉलमधून बाहेर आल्यानंतर शाहरुख आणि आमिर यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं… तेव्हात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एन्ट्री झाली. संपूर्ण कुटुंबासोबत राज ठाकरे यांनी अर्जुन याच्या लग्नात हजेरी लावली… व्हिडीओमध्ये राज ठाकरे त्यांच्या कुटुंबियांसोबत दिसत आहेत.
अर्जुन-सानियाच्या लग्नात, गौरी खानने सोनेरी साडी नेसली होती, जी तिने कमीत कमी दागिन्यांसह आणि सॉफ्ट ग्लॅम मेकअपने सजवली होती, अशा रॉयल लूकमध्ये गौरी हिला स्पॉट करण्यात आलं. तर सुहाना हिने देखील आईसोबत मॅचिंग केलं होतं… सांगायचं झालं तर, गौरी आणि सुहाना कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात.
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांच्या लग्नाला अमिताभ बच्चन, जया, अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन तसेच चित्रपट निर्माते विधू विनोद चोप्रा यांच्यासह अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी उपस्थित होते. धोनी, राहुल द्रविड, युवराज सिंग, अनिल कुंबळे, वेंकटेश प्रसाद आणि इतर अनेक क्रिकेट दिग्गजांनीही या लग्न सोहळ्याला हजेरी लावली. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा विवाह 5 मार्च रोजी मुंबईत झाला. हा भव्य समारंभ मुंबईतील आलिशान द सेंट रेजिस येथे झाला.