
बॉलिवूडचा बादहाश अभिनेता शाहरुख खानचे किती चाहते आहेत हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आजही शाहरूखला रोमान्सचा किंग म्हणूनच ओळखतात. शाहरूख खानने इतके वर्ष बॉलिवूडवर राज्य केलं एवढंच नाही तर प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजनही केलं. आता त्याची मुलगी सुहाना खाननेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तिचा अभिनयाचा पहिला टप्पा नेटफ्लिक्सवरील ‘द आर्चीज’ या चित्रपटातून झाला होता. आता सुहाना ‘किंग’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती तिच्या वडिलांसोबत दिसणार आहे. एवढंच नाही तर शाहरुखचा मोठा मुलगा आर्यन खान दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. अलीकडेच, तो ‘बॅडएस ऑफ बॉलीवुड’ ही वेब सिरीज बनवत असल्याच्या चर्चा आल्या होत्या.
आर्यनने शाहरुखच्या बालपणीची भूमिका केली होती.
मात्र हे फार कमी जणांना माहित असेल की आर्यन खान अनेक वर्षांपूर्वी बॉलिवूडच्या एका ब्लॉकबस्टर चित्रपटामध्ये दिसला आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटाच शाहरूख खान देखील होता. या सुपरहीट चित्रपटात आर्यनने शाहरुखच्या बालपणीची भूमिका केली होती. त्यावेळी आर्यन फक्त चार वर्षांचा होता. तसेच आर्यनने अमिताभ बच्चन यांच्या मुलाची भूमिका केली होती.
आर्यनने केलेला हा चित्रपट कोणता?
आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत तो चित्रपट म्हणजे ‘कभी खुशी कभी गम’ आहे. होय, या चित्रपटात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, काजोल, जया बच्चन, करीना कपूर खान आणि हृतिक रोशन सारखे मोठे स्टार होते. आर्यनने त्यात तो शाहरूच्या बालपणीची भूमिका साकारताना दिसला होता.
जया बच्चन यांच्यासोबत आहेत सीन
या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी शाहरुख खानच्या आई-वडिलांची भूमिका साकारली होती. चित्रपटात एका सीनमध्ये एक लहान मुलगा जया बच्चन यांच्या सोबत दिसत आहे . त्या आई म्हणून त्याची काळजी घेताना, त्याला जेवण भरवताना दिसत आहे. तो लहान मुलगा म्हणजे आर्यन खान आहे. पण, तो फक्त या सीनपुरताच दिसला. त्याची भूमिका खूपच लहान होती.
‘कभी खुशी कभी गम’ नंतर, या चित्रपटात देखील बाल कलाकार म्हणून काम केलं
‘कभी खुशी कभी गम’ नंतर, आर्यन दुसऱ्या चित्रपटात बालकलाकार म्हणून दिसला. आर्यनने ‘कभी अलविदा ना कहना’ मध्येही काम केलं होतं. 2006 च्या या चित्रपटात अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, प्रीती झिंटा आणि शाहरुख खान यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. आर्यनने ‘द लायन किंग’ या अॅनिमेटेड चित्रपटातही आपला आवाज दिला आहे. आता तो दिग्दर्शक म्हणून एक नवीन इनिंग सुरू करणार आहे. त्याची ‘बॅडस ऑफ बॉलिवूड’ ही मालिका नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. बॉबी देओल आणि राघव जुयालसह इतर अनेक स्टार्स त्यात दिसणार आहेत.