AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asha Bhosale : बस्स… मला आता…, आशा ताईंच्या शेवटच्या क्षणांवर कुणी केला मोठा खुलासा

Asha Bhosale : मृत्यू जवळ येत असताना कशा होत्या आशा ताईंच्या भावना... शेवटच्या क्षणी काय म्हणायच्या? कुणी केला मोठा खुलासा... आशा भोसले यांच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

Asha Bhosale : बस्स... मला आता..., आशा ताईंच्या शेवटच्या क्षणांवर कुणी केला मोठा खुलासा
Asha Bhosale
| Updated on: Apr 13, 2026 | 10:25 AM
Share

Asha Bhosale : दिग्गज गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं आहे… जवळपास 7 दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी संगीताची सेवा केली. आशा ताईंच्या प्रत्येक श्वासात फक्त आणि फक्त संगीत होतं. आशा ताईंच्या निधनाची बातमी समोर आली आणि बॉलिवूड सोबतच संगीत विश्वाला मोठा धक्का बसला. आशा भोसले यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान कंपोजर शमीर टंडन यांनी देखील ताईंच्या निधनावर शोक व्यक्त केला.

आशा भोसले यांच्या निधनानंतर शमीर म्हणाले, ‘आशा ताई माझ्यासाठी एका मार्गदर्शक आणि आई समान होत्या..’, सांगायचं झालं तर, शमीर शेख यांनी आशा भोसले यांच्यासोबत नॅशनल अवॉर्ड विनिंग सिनेमा ‘पेज 3’ मध्ये काम केलं होतं… सिनेमातील ‘कितने अदीब रिश्ते है’ गाण्याला आपला आवाज दिलेला… शमीर म्हणतात, आई ताई कायम त्यांना नवी टेक्नोलॉजी आणि बदलत्या काळासह स्वतःला अपडेट ठेवण्यास सांगायच्या…

शमीर टंडन यांनी आठवण सांगितली की, आयुष्याच्या या टप्प्यावर आशाताई अनेकदा जीवनाच्या परिपूर्णतेबद्दल बोलत होत्या. आत्मविश्वासाने म्हणायच्या, “आता बस्स झालं, मला आता चांगल्या प्रकारे जायचं आहे… आता मला देवाला भेटायचं आहे.” शमीर यांच्या मते, त्यांच्या शब्दांतून समाधान आणि शांतीची भावना प्रतिबिंबित होत होती, जणू काही त्यांना आता कोणतीही खंत उरली नव्हती आणि त्या पुढील प्रवासासाठी पूर्णपणे तयार होत्या.

आज संध्याकाही होणार आशा भोसले यांच्यावर अंत्यसंस्कार

1933 मध्ये आशा भोसले यांचा जन्म झाला. वयाच्या 10 व्या वर्षापासून त्यांनी संगीत क्षेत्रात पदार्पण केलं. त्यांनी शास्त्रीय संगीत, गझल, लोकगीत आणि पॉप सहित अनेक जॅनरच्या गाण्यांना स्वतःचा आवज दिला… जगातील सर्वात जास्त रिकॉर्डिंग करण्यार कलाकारांमध्ये आशाताई अव्वल राहिल्या. अशात आशा ताईंच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून लोकांना आशा ताईंचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. आशा भोसले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत…

Follow Us
शिवसेना कुणाची? प्रतिक्षा निकालाची; कोर्टात सुनावणी सुरूवात
Shivsena | शिवसेना कुणाची? प्रतिक्षा निकालाची; कोर्टात सुनावणी सुरूवात, आज...
नार्को टेस्टलाही तयार!; जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचं सडेतोड उत्तर
Chandrashekhar Bawankule on Manoj Jarange | नार्को टेस्टलाही तयार!; जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचं सडेतोड उत्तर
जरांगे पाटलांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
जरांगे पाटलांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले कोर्टात...
आंदोलन पेटलं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल; जरांगेंचा फडणवीसांना इशारा
Manoj Jarange | आंदोलन पेटलं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल; मनोज जरांगेंचा फडणवीसांना थेट इशारा
उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल
Manoj Jarange | उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! थेट एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष, नेमकं काय घडलं?
डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग...शिंदेंवर जरांगेंची तोफ धडाडली
Manoj Jarange on Eknath Shinde | डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग... एकनाथ शिंदेंवर मनोज जरांगेंची तोफच धडाडली
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर आरोप
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर गंभीर आरोप
कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेसचा हल्ला
Vijay Wadettiwar | कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेस नेत्यांचा जोरदार हल्ला
अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं
Delhi | अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं; पुन्हा कामकाज स्थगित