AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशा भोसलेंना आर. डी. बर्मन यांनी दिलेली झाडू, पण त्यात दडलं होतं… वाचा बर्थडेचा मजेशीर किस्सा

आर. डी. बर्मन यांनी आशा भोसलेंना वाढदिवसाला एक अतिशय विचित्र आणि अनोखी भेट दिली होती. झाडू आणि माशांचे हे गिफ्ट नेमके का दिले होते? वाचा या खास आठवणीचा रंजक किस्सा.

आशा भोसलेंना आर. डी. बर्मन यांनी दिलेली झाडू, पण त्यात दडलं होतं... वाचा बर्थडेचा मजेशीर किस्सा
asha bhosale
| Updated on: Apr 13, 2026 | 12:03 PM
Share

भारतीय चित्रपटसृष्टीला आपल्या आवाजाने भुरळ घालणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना शनिवारी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संगीत विश्वाला जबरदस्त धक्का बसला असून सिनेसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. आशा भोसले यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांचे अनेक किस्से, आठवणी जागवल्या आहेत. आशा भोसले आणि महान संगीतकार आर. डी. बर्मन (पंचम दा) यांची जोडी केवळ संगीतासाठीच नाही, तर त्यांच्या अनोख्या प्रेमकहाणीसाठीही ओळखली जाते. आर. डी. बर्मन यांनी आशा भोसलेंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखी भेट दिली होती. याचा किस्सा स्वत: आशा भोसले यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता.

त्यांनी मला झाडू गिफ्ट गिफ्ट केला

आशा भोसले यांना स्वच्छतेची कमालीची आवड आहे. त्यांच्या या सवयीला अनुरुप म्हणून आर. डी. बर्मन यांनी त्यांना एकदा वाढदिवसाला एक अतिशय वेगळी आणि गमतीशीर भेट दिली होती. मला स्वयंपाक आणि साफसफाई दोन्हीही करायला आवडते. या दोन्ही गोष्टी मी उत्तम करते, हे पंचम दांना ठाऊक होते. त्यामुळे त्यांनी एकदा एका वाढदिवसासाठी मला झाडू गिफ्ट केला होता. पण त्यात एक अनोखा ट्वीस्ट होता, असे आशा भोसले म्हणालेल्या.

पंचम दा यांनी दिलेल्या झाडूच्या आत मासे ठेवले होते. त्यांनी मला झाडूसोबत मासे गिफ्ट म्हणून दिले होते. मी खूप उत्कृष्ट जेवण बनवते, मासेही बनवते हे त्यांना माहिती होते. तसेच मला स्वच्छताही खूप आवडते हे देखील त्यांना माहिती होते. त्यामुळेच त्यांनी मला या दोन्ही गोष्टी दिल्या होत्या. त्यांनी मला बांगडा मासा भेट म्हणू दिला हातो, असा किस्सा आशा भोसले यांनी सांगितला होता.

आशा भोसले आणि पंचम दा यांच्या घरी संगीताची एक खास खोली होती, जी त्यांच्यासाठी रियाझ रूम होती. अनेक सुपरहिट गाण्यांचा उगम याच खोलीत झाला. तिथेच सुमधुर चाली तयार व्हायच्या. आशा भोसले आणि आर. डी. बर्मन यांनी १९८० मध्ये विवाह केला. ‘दम मारो दम’, ‘पिया तू अब तो आजा’ आणि चुरा लिया है तुमने यांसारखी अजरामर गाणी या जोडीने गायली. त्यांची ही गाणी आजही त्यांच्यातील त्या सुंदर केमिस्ट्रीची साक्ष देतात.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल