Asha Bhosle : आशा भोसलेंनी सुपरस्टार मराठी अभिनेत्याला घातलेली लग्नाची मागणी, दोन अटींमुळे नकार पदरी; काय घडलेलं?

Asha Bhosle : आशा भोसले यांनी सुपरस्टार मराठी अभिनेत्याला लग्नाची मागणी घातलेली. त्याचबरोबर त्यांनी दोन अटीसुद्धा ठेवलेल्या. मात्र, त्यामुळे आशा भोसले यांना नकार मिळाला.

Asha Bhosle : आशा भोसलेंनी सुपरस्टार मराठी अभिनेत्याला घातलेली लग्नाची मागणी, दोन अटींमुळे नकार पदरी; काय घडलेलं?
| Updated on: Oct 10, 2026 | 7:14 PM

भारतीय संगीतविश्वात आपल्या बहारदार आवाजानं वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आशा भोसले यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. व्यावसायिक आयुष्यात त्यांनी यशाचं शिखर गाठलं, पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलही अनेकदा चर्चा झाल्या. त्यापैकीच एक चर्चेत राहिलेला विषय म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि विनोदी कलाकार दादा कोंडके यांच्याशी जोडलं गेलेलं त्यांचं नातं. आशा भोसले यांनी हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टीतही आपल्या गायनाचा ठसा उमटवला. दुसरीकडे, दादा कोंडके यांनी आपल्या अनोख्या विनोदी शैलीनं मराठी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. दोघंही आपापल्या क्षेत्रात लोकप्रियतेच्या शिखरावर होते.

माध्यमांतील वृत्तांनुसार, आशाताई आणि दादा कोंडके यांच्यात चांगली मैत्री निर्माण झाली होती. भेटीगाठी, एकत्र वेळ घालवणं आणि कामाच्या निमित्तानं होणारा संपर्क यामुळे त्यांच्या नात्याची चर्चा रंगू लागली. दादा कोंडके यांच्या ‘एकटा जीव’ या आत्मचरित्रात ‘आशा निराशा’ असं म्हणत या नात्याचा उल्लेखही करण्यात आला आहे.

Loading...

आशा भोसलेंनी दादा कोंडकेंना घातलेली लग्नाची मागणी

दादा कोंडके यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही अनुभवांनंतर त्यांच्या आयुष्यात एकटेपणाचा काळ आला होता. आशा भोसले यांचे पहिले वैवाहिक नातंही फार काळ टिकलं नव्हतं.

1976 मध्ये दादा कोंडके यशाच्या शिखरावर होते. याचदरम्यान त्यांची आणि आशा भोसले यांची भेट झाली. दोघंही भेटायचे, शॉपिंगला जायचे. दादा कोंडके वेळ मिळेल तसा आशाताईंच्या गाण्यांच्या रोकॉर्डिंगला जायचे. दादा कोंडके यांचं आशा ताईंच्या घरीसुद्धा जाणं येणं असायचं. काही दिवसांनी आशा भोसले यांनीच दादा कोंडके यांना लग्नाबद्दल विचारलं. पण, त्यासोबत त्यांनी दोन अटीसुद्धा ठेवलेल्या. एक म्हणजे, त्या लग्नानंतर कोंडके आडनाव लावणार नाहीत आणि दुसरी अट म्हणजे दादांनी त्यांच्या फ्लॅटमध्ये राहायला यायचं. आशाताईंच्या या अटींमुळे दादा गोंधळून गेले. त्यामुळे त्यांनी थेट कोल्हापूरला जाऊन भालजी पेंढारकर यांना याबद्दल सांगितलं. त्यावेळी भालजी पेंढारकर यांनी दादांना अजिबात लग्नाच्या भानगडीत पडू नकोस, असं सांगितलं.

दादा कोंडके यांनी भालजी पेंढारकरांचा सल्ला ऐकला आणि आशाताईंना लग्नासाठी नकार दिला. त्यानंतर आशा भोसले यांनी आर. डी. बर्मन यांच्यासोबत लग्न केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us