Asha Parekh : ‘तुझ्या लेकीने असे कपडे घातले तर…’, छोट्या कपड्यांवर प्रचंड भडकल्या आशा पारेख

Asha Parekh : अभिनेत्रींकडून दिग्दर्शकांची अंगप्रदर्शनाची मागणी... प्रचंड भडकल्या आशा पारेख..., थेट म्हणाल्या, 'तुझ्या लेकीने असे कपडे घातले तर...', सध्या सर्वत्र आशा पारेख यांच्या वक्तव्याची चर्चा...

Asha Parekh : तुझ्या लेकीने असे कपडे घातले तर..., छोट्या कपड्यांवर प्रचंड भडकल्या आशा पारेख
अभिनेत्री आशा पारेख
| Updated on: Jun 09, 2026 | 11:10 AM

Asha Parekh : सांगायचं झालं तर, सिनेमा हीट करण्यासाठी किंवा प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी दिग्दर्शक अनेकदा अभिनेत्रींना पडद्यावर वाईट प्रकारे दाखवतात. अभिनेत्रींकडून कायम अंगप्रदर्शनाची मागणी केली जाते. अशात गेल्या काही दिवसांपासून हा मुद्दा पेटला आहे कारण, अभिनेत्री जान्हवी कपूर हिचे, ‘पेद्दी’ सिनेमात अनेक सीन्स असे आहेत, जे वादग्रस्त ठरत आहे… जान्हवी हिचे सीन्स पाहिल्यानंतर अभिनेत्रींनी स्वतःचं वस्तूकरण करणं थांबवावं… असं अनेकांना म्हचटलं आहे. सध्या ‘पेद्दी’ सिनेमात जान्हवी हिने साकारलेल्या भूमिकेवर अनेकांनी टीका केली आहे.

दरम्यान, बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री आशा पारेख आणि जया बच्चन यांनी त्या काळाबद्दल सांगितलं, जेव्हा ग्लॅमर आणि मादकता पडद्यावर दाखवण्यासाठी अभिनेत्रींच्या शरीराचा वापर केला जात नव्हता. आशा पारेख यांनी सांगितलं की, एका दिग्दर्शकाने त्यांना छोटे कपडे घालण्यास सांगितले होते. तेव्हा त्या भडकल्या आणि दिग्दर्शकाला म्हणाला, ‘तुझ्या मुलीला असे कपडे घालशील का?’ तेव्हा दिग्दर्शकाची बोलती बंद झाली आणि त्याने आशा यांनी छोटे कपडे देण्याचा निर्णय बदलला.

आशा पारेख यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी दिग्दर्शकाला त्यांच्या मुलीबद्दल असं काहीतरी म्हटलं, जे त्यांना लागलं. तर दुसरीकडे, जया बच्चन म्हणाल्या की, त्यांच्यासोबत कोणीही मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला नाही.

एका मुलाखतीत आशा पारेख म्हणाल्या, ‘मला चांगलं आठवत आहे, एका दिग्दर्शकाने डान्स नंबरसाठी छोटे कपडे घालण्यास सांगितले होते. तेव्हा संतापात मी त्याला म्हणाले, ‘जर तुझी लेक असती, तर तिच्यावर हे कपडे चांगले दिसले असते का?’ त्यानंतर त्या दिग्दर्शकाने गुपचूप ते ड्रेस माझ्यापासून दूर केले…’

पुढे आशा पारेख म्हणाल्या, ‘आजच्या अभिनेत्री इतक्या सुंदर आहेत की, त्यांनी स्वतःचं वस्तूकरण करणं थांबवलं पाहिजे. पाहायचं झालं तर, संजय लिला भंन्साळी यांच्या सिनेमांमध्ये अभिनेत्री किती सुंदर दिसतात. ते अभिनेत्रींना किती कलात्मक पद्धतीने पडद्यावर सादर करतात. नाही तर दुसरे दिग्दर्शक अभिनेत्रींना वेगवेगळ्या पद्धतीने शोषण करणाऱ्या पद्धतीने त्यांना सादर करतात.’ असं देखील आशा पारेख म्हणाल्या.

आशा पारेख यांचं करियर

आशा पारेख यांच्या फिल्मी करियरबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी अभिनय विश्वात पदार्पण केलं. 1959 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल देके देखो’ सिनेमातून त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यांनी अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले आणि अनेक दिग्गज सेलिब्रिटींसोबत काम केलं. आजही त्यांचे सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहतात.

Follow Us