Ashok Saraf : दादा कोंडके अन् डबल मिनिंग जेकचे सिनेमे.. अशोक सराफ यांनी का सोडली साथ? जाणून व्हाल हैराण
Ashok Saraf : मराठा सिनेविश्वात एक काळ असा होता जेव्हा दिवंगत अभिनेते दादा कोंडके आणि अभिनेते अशोक सराफ यांनी मराठी सिनेविश्वावर राज्य केलं. पण त्यानंतर दोघे कधी कोणत्या सिनेमात झळकेच नाही. याबद्दल एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी मोठा खुलासा केलेला.

Ashok Saraf : अभिनेते अशोक सराफ सध्या ‘आदि अनंत’ सिनेमामुळे चर्चेत आहेत. सिनेमात त्यांनी आजोबांची भूमिका साकारली आहे तर, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने नातवाची भूमिका साकारली आहे. पण मराठी सिनेविश्वात एक काळ असा होता, जेव्हा दिवंगत अभिनेते दादा कोंडके आणि अभिनेते अशोक सराफ यांनी रुपेरी पडद्यावर राज्य केलं होतं. दादा कोंडके यांचे अनेक सिनेमे मोठ्या पडद्यावर हीट ठरले. त्यांच्या अनेक सिनेमांमध्ये डबल मिनिंग विनोद असायचे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी देखील दादा यांच्यासोबत अनेक सिनेमांमध्ये स्क्रिन शेअर केली. अशात नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी दादा कोंडके यांच्या डबल मिनिंग विनोदावर स्वतःचं मत मांडलं आहे.
अशोक सराफ यांचा काळ असा होता जेव्हा दादा कोंडके यांनी सात – आठ जुबली हिट मराठीसिनेविश्वाला दिले होते. तो काळा दादा कोंडके यांना गाजवलेला. त्यांच्या अनेक सिनेमांमध्ये दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण त्यानंतर अशोक सराफ आणि दादा कोंडके कोणत्या सिनेमात दिसले नाही. त्यामुळे तेव्हा नक्की काय झालेलं, दोघे एकत्र का दिसले नाहीत? अशा प्रश्नांना उधाण आलं. यावर एका मुलाखतीत खु्द्द अशोक सराफ यांनी मोठं वक्तव्य केलं होतं.
दादा कोंडके आणि त्यांच्या सिनेमांबद्दल बोलताना अशोक सराफ म्हणाले, ‘पहिला सिनेमा ‘पांडू हवलदार’ त्यामध्ये डबल मिनिंग असं काहीही नव्हतं. दुसरा सिनेमा ‘तुमचं आमचं जमलं’ सिनेमात मी काम केलं. त्यामध्ये मी विलन होते. म्हणून त्या सिनेमात देखील कोणतंच डबल मिनिंग नव्हतं. ‘राम राम गंगाराम’ तिसरा सिनेमा, त्या सिनेमापासून डबल मिनिंगला सुरुवात झाली आणि त्यांच्यासोबत तो शेवटचा सिनेमा…त्यानंतर पुढे डबल मिनिंग सुरुच राहिलं.’
एवढंच नाही तर, ‘राम राम गंगाराम सिनेमानंतर दादा कोंडके यांनी चौथ्या सिनेमासाठी तुम्हाला विचारलं नाही की सिनेमेच बदलले?’, यावर अशोक सराफ म्हणाले, ‘सिनेमेच बदलले त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यांनीच मला नाही घेतलं. तेव्हा माझं असं झालं की, बरं झालं नाही विचारलं. विचारलं असतं तर, मला सिनेमात काम करावं लागलं असतं. त्यानंतर असं झालं की, असं नको, तसं नको…’
पुढे अशोक सराफ म्हणाले, ‘त्यानंतर मला अनेक वर्षांनंतर त्यांनी मला विचारलं. पण मला स्क्रिप्ट दिलंच नाही. मग मी हळूच चोरुन संपूर्ण स्क्रिप्ट वाचली आणि तेव्हा मला कळलं याचं भूमिका मी पूर्वी साकारल्या आहेत. त्यामुळे पुन्हा साकरण्यात काय अर्थ आहे. तेव्हा मी स्पष्ट नकार दिला. नाही केला सिनेमा..’, असं देखील अशोक सराफ म्हणाले. तर अशोक सराफ आजही मोठ्या पडद्यावर सक्रिय आहेत.