Ashok Saraf: लक्ष्मीकांत बेर्डेंने त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये मला फॉलो केलंय…अशोक सराफ यांच्या विधानानं खळबळ

Ashok Saraf On Laxmikant Berde Career: मराठीती ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी आता लक्ष्मीकांत बेर्डेबद्दल एक विधान केले आहे.

Ashok Saraf: लक्ष्मीकांत बेर्डेंने त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये मला फॉलो केलंय...अशोक सराफ यांच्या विधानानं खळबळ
| Updated on: Nov 03, 2026 | 10:26 AM

Ashok Saraf On Laxmikant Berde: मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहेय. विनोदी भूमिका असो किंवा गंभीर भूमिका अशोक सराफ यांनी आपल्या हटके अभिनयाने त्या सर्व भूमिका गाजवल्या आहेत. मराठी इंडस्ट्रीमध्ये तर त्यांच्या तोडीस तोड एकमेव अभिनेता होता आणि तो म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीकांत बेर्डे यांनीही आपल्या कारकिर्दीत अनेक विनोदी भूमिका साकारल्या आहेत, तर यासोबतच गंभीर भूमिकाही साकारल्या आहेत. एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी लक्ष्याने मला फॉलो केलं असल्याचे म्हटले आहे. शिवाय लक्ष्याला विनोदी भूमिका सोडून दुसरं काही जमलंच नाही असंही यावेळी त्यांनी बोलून दाखवलं आहे.

अशोक यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की,” लक्ष्या हा एक टॅलेंटेड कलाकार होता. काय काय कलाकारांनी काहीत बॅकग्राउंड नसताना आपलं करिअर सुरु केलंय. त्यातील लक्ष्या हा एक आहे. त्याला आगापिछा काहीच नव्हता. नाटकाचं, सिनेमाचं त्यालसा कसलंच, काहीच माहित नव्हतं, घरी कोणी केलेलं आहे, मोठा नट वगैरे आहे असंही काही नाही. छोटे छोटे रोल करुन तो पुढे आला आहे. हे त्याच्यासाठी क्रिडिटेबल आहे. कोणाचाही आधार नसताना एवढ साध्य करणं हे खूप मोठं काम आहे. त्याने केलेले सगळे रोल हे जर काढून पाहिलेत तर त्याने मला फॉलो केल्याचे पाहायला मिळेल, त्याने स्ट्रेट मलाच फॉलो केलंय, अर्थात स्टाइल वेगळी असली तरीही, टायमिंग अगदी तसाच होता.”

Loading...

“फार लवकर गेला तो नाही तर त्याने बरंच काही साध्य केलं असतं. त्याचा ड्रॉबॅक एवटढाच की तो फक्त कॉमेडी तर कॉमेडीच घेऊन बसायचा. त्याने व्हरायटी कधी ट्राय केलीच नाही, आम्ही दोघांनी मिळून ५० सिनेमात एकत्र काम केलंय, तो नेहमीच माझा सहाय्यक होता, मी हिरो तो माझा भाऊ, ड्रायव्हरही तो असायचा माझा. ज्यावेळे राजा परांजपे, मास्टर विनायक काम करायचे त्यांची एक वेगळीच स्टाईल असायची. ती हळू हळू कमी होत गेली. पिढी बदलली तसे विनोदही बदलत गेले. ” असं त्यांनी बोलून दाखवले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us