AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satara District Central Cooperative Bank Election : कुणी ईश्वर चिठ्ठीने तर कुणी 4 मतांनी विजयी; सातारा जिल्हा बँकेच्या निकालाची संपूर्ण अपडेट एका क्लिकवर

सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, यात अनेक धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळाले. काही उमेदवार अवघ्या ४ मतांनी जिंकले, तर काही जणांचे भवितव्य ईश्वरचिठ्ठीने ठरले. काही मतदारांना शून्य मते मिळाल्याचा अनुभवही आला. महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत विजयी उमेदवारांचा जल्लोष सुरू असून, पराभूत उमेदवारांमध्ये निराशा पसरली आहे.

Satara District Central Cooperative Bank Election : कुणी ईश्वर चिठ्ठीने तर कुणी 4 मतांनी विजयी; सातारा जिल्हा बँकेच्या निकालाची संपूर्ण अपडेट एका क्लिकवर
Satara District Central Cooperative Bank ElectionImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 03, 2026 | 10:24 AM
Share

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. या निवडणुकीत कुणी अवघ्या 4 मतांनी निवडून आलंय. कुणाचं भवितव्य ईश्वर चिठ्ठीने ठरणार आहे. तर कुणाला शून्य मते मिळाल्याने धक्का बसला आहे. या निवडणुकीनंतर काहींचा जल्लोष सुरू झाला आहे. तर काहींच्या चेहऱ्यावर निराशा पसरली आहे. हा निकाल काहींसाठी आशेचा किरण घेऊन आला आहे. तर काहींची अवस्था आता पुढच्या निवडणुकीपर्यंत पर्याय नाही, अशी झाली आहे.

कोरेगावात चिठ्ठी फाटली

कोरेगाव तालुका सोसायटी मतदारसंघामध्ये चिठ्ठी फाटल्याने मोठा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादीचे सुनील माने यांना 44 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या सुनील खत्री यांनाही 44 मते मिळाल्याने टाय झाला आहे. यावेळी एक फाटलेली चिठ्ठी बाजूला ठेवल्याने ट्विस्ट आला आहे. एक मतपत्रिका बाद झाल्याने दोघांचे भवितव्य आता ईश्वर चिट्टीवर ठरणार आहे.

जावळी सोसायटीत अवघे आठ मते

जावळी सोसायटीची निवडणूक अत्यंत रंजक ठरली. राष्ट्रवादीच्या विठ्ठल गोळे यांना केवळ 8 मते मिळाली. तर भाजपच्या ज्ञानेश्वर रांजणे यांना 38 मते मिळाली. रांजणे हे 30 मतांनी विजयी झाले आहेत.

खंडाळा सोसायटीत शून्य मते

खंडाळा सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजय भोसले यांना 28 मते, भाजपच्या संजीव गाढवे यांना 21 मते आणि अपक्ष शामराव गाढवे यांना शून्य मते मिळाली आहेत. धक्कादायक म्हणजे शामराव गाढवे यांना त्यांचंही मत मिळालेलं नाही.

चार मतांनी विजय

महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या रुपाली राजपुरे यांनी 8 मते मिळाली आहेत. तर शिवसेनेच्या संजय मोरे यांना केवळ चार मते मिळाली आहेत. या अटीतटीच्या लढाईत रुपाली राजपुरे या अवघ्या चार मतांनी विजयी झाल्या आहेत.

शंभुराज देसाई विजयी

पाटण सोसायटी मतदारसंघात शिवसेनेचे शंभुराज देसाई विजयी झाले आहेत. त्यांना 58 मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित पाटणकर यांना 46 मते मिळाली आहेत.

जयकुमार गोरे सुस्साट

मान सोसायटी मतदारसंघात भाजपचे जयकुमार गोरे 53 मते घेऊन जिंकले आहेत. राष्ट्रवादीचे मनोज पोळ यांना 14 तर शिवसेनेच्या शेखर गोरे यांना 7 मते मिळाली आहेत.

Follow Us
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या सत्तेचा आज फैसला; 10 जागांसाठी मतमोजणी....
Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या सत्तेचा आज फैसला; 10 जागांसाठी मतमोजणी, कोण मारणार बाजी?
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शंभूराज देसाईंची बाजी, पाटणकरांना....
Satara District Bank Election Result : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शंभूराज देसाईंची बाजी, पाटणकरांना धक्का; कार्यकर्त्यांचा जल्लोष
हायकोर्टात राम पूर्णेकरांचे वकील महत्त्वाचे पुरावे सादर करणार....
Pradeep Purnekar : Ram Purnekar : हायकोर्टात राम पूर्णेकरांचे वकील महत्त्वाचे पुरावे सादर करणार; कोणते महत्त्वाचे मुद्दे समोर येणार?
सांगली जिल्हा बँकेच्या 6 जागांसाठी आज निकाल; कोण मारणार बाजी?
Sangli Bank Election Result : सांगली जिल्हा बँकेच्या 6 जागांसाठी आज निकाल; कोण मारणार बाजी?
चार नाही, माझ्याकडे खूप ऑडिओ क्लिप्स! आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार...
Manoj Jarange Patil : चार नाही, माझ्याकडे खूप ऑडिओ क्लिप्स! आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार... मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा
महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर; आधी सत्तेतून बाहेर पडा...
Mahayuti : महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर; आधी सत्तेतून बाहेर पडा, मग... महेंद्र थोरवेंचं तटकरेंना थेट आव्हान
ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाचा, आमदार अपात्रतेचं काय होणार? आज....
Shivsena : ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाचा, आमदार अपात्रतेचं काय होणार? आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी
महायुतीत नवी राजकीय समीकरणं? पालघरमध्ये शिंदे सेनेची स्वबळाची तयारी...
Shivsena : महायुतीत नवी राजकीय समीकरणं? पालघरमध्ये शिंदे सेनेची स्वबळाची तयारी; योगेश कदमांनी दिले संकेत
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
Radhakrishna Vikhe-Patil : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळणार पाणी; विखे पाटलांनी सांगितलं संपूर्ण नियोजन
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक