Tusshar Kapoor : 5 कोटींची खंडणी अन् बिश्नोई गँगचे नाव! तुषार कपूरला आलेल्या धमकीच्या फोनने खळबळ
Tusshar Kapoor : बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींना बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी आणि खंडणीसाठी फोन आले आहे. आता अभिनेता तुषार कपूर याला देखील 5 कोटींच्या खंडणीसाठी फोन आला. पण फोननंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Tusshar Kapoor : बॉलिवूडमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे. अनेक सेलिब्रिटींना जीवे मारण्याची धमकी आणि खंडणीसाठी फोन आले आहे. काही दिवसांपूर्वी तर, अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार करण्यात आला. आता अभिनेता तुषार कपूर याला लॉरेन्स गँगचा सदस्य हॅरी बॉक्सर याच्या नावाने फोन आल्याची माहिती समोर येत असून, तुषार याच्याकडे तब्बल 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. यामुळ बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.
रिपोर्टनुसार, तुषार कपूर याने आलेल्या धमकीच्या कॉलची सर्व माहिती पोलिसांना दिली आहे. अभिनेत्याच्या तक्रारीनंतर याप्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली आहे. सध्या पोलिसांचं पथक याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.
गुन्हे शाखेच्या तांत्रिक पथकाने धमकीच्या कॉलच्या ऑडिओ रेकॉर्डिंगची तपासणी केली. त्यानंतर आवाजाची पडताळणी हॅरी बॉक्सरच्या अधिकृत ऑडिओ नमुन्याशी करण्यात आली. पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, दोन्ही आवाज एकमेकांशी जुळत नाहीत. यामुळे हा बनावट कॉल असल्याचा पोलिसांना संशय आहे. कुणीतरी गँगचं नाव वापरून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आता पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत, ज्याने धमकीची ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवली होती.
तुषार कपूर याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो अभिनेते जितेंद्र कपूर आणि शोभा कपूर यांचा मुलगा आहे. त्याची बहीण एकता कपूर टीव्ही आणि सिनेमा निर्मिती आहे, तुषार याने 2001 मध्ये ‘मुझे कुछ केहना है’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमा तुषार याच्यासोबत अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत स्क्रिन शेअर केलेली. या सिनेमासाठी तुषार याला बेस्ट मेल डेब्यूचा पुरस्कार मिळालेला.
तुषार याने ‘क्या दिल ने कहा’, ‘जीना सिर्फ मेरे लिए’ आणि ‘ये दिल’ सारख्या सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली. पण तुषार याला खरी ओळख ‘क्या कूल हैं हम’, ‘गोलमाल’, ‘गोलमाल रिटर्न्स’ आणि ‘गोलमाल 3’ या कॉमेडी सिनेमांमुळे मिळली. ‘शोर इन द सिटी’ या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचेही खूप कौतुक झालं.
तुषार याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, जून 2016 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून अभिनेता मुलगा लक्ष्यचा वडील झाला. अभिनयाव्यतिरिक्त ते सिनेमा निर्मितीतही सक्रिय आहेत. तुषार कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.
