Ask SRK : गप्प बस, तू फक्त..; ‘जवान’च्या कमाईबद्दल प्रश्न विचारणाऱ्याला शाहरुखचं उत्तर

अभिनेता शाहरुख खानने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका नेटकऱ्याने त्याला जवान या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी प्रश्न विचारला. त्यावर किंग खानने त्याच्याच अंदाजात उत्तर दिलं आहे. शाहरुखचं हे उत्तर सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.

Ask SRK : गप्प बस, तू फक्त..; जवानच्या कमाईबद्दल प्रश्न विचारणाऱ्याला शाहरुखचं उत्तर
Jawan
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 27, 2023 | 8:16 PM

मुंबई | 27 सप्टेंबर 2023 : बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानसाठी 2023 हे वर्ष खूपच खास आहे. कारण या वर्षाच्या सुरुवातीला त्याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं. त्याचा ‘पठाण’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला. त्याच्या काही महिन्यांतच आता ‘जवान’ हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शाहरुखच्या ‘जवान’ या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. या वर्षातील त्याचा हा दुसरा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ची कमाई अजूनही सुरूच आहे. प्रत्येक दिवशी हा चित्रपट नवीन रेकॉर्ड आपल्या नावे करतोय. अशातच शाहरुखने ट्विटरच्या माध्यमातून नुकताच चाहत्यांची संवाद साधला. ‘आस्क एसआरके’ या सेशनअंतर्गत त्याने चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं त्याच्याच खास अंदाजात दिली. यादरम्यान एका चाहत्याने त्याला जवान या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून प्रश्न विचारला.

जवानच्या कलेक्शनविषयी सवाल

शाहरुख सहसा कोणत्या माध्यमांना मुलाखत देताना दिसत नसला तरी ट्विटरच्या माध्यमातून तो वेळोवेळी चाहत्यांशी संवाद साधतो. आस्क एसआरके या सेशनअंतर्गत तो चाहत्यांना त्याला थेट प्रश्न विचारण्याची संधी देतो आणि या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तो त्याच्याच खास अंदाज देतो. बुधवारी या सेशनअंतर्गत एका युजरने ‘जवान’ या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल शाहरुखला प्रश्न विचारला. जवानच्या खोट्या कलेक्शन नंबरविषयी काय बोलशील? कलेक्शनचा हा आकडा बनावट असल्याचं वृत्त अनेक ठिकाणी वाचायला मिळत आहे, असा सवाल संबंधित युजरने केला.

शाहरुखचं उत्तर

विराट कोहलीबद्दल काय म्हणाला?

नेटकऱ्याच्या या प्रश्नावर उत्तर देताना शाहरुखने लिहिलं, ‘गप्प बस आणि फक्त मोजत रहा. मोजताना विचलित होऊ नकोस.’ शाहरुखच्या या उत्तराची चर्चा सोशल मीडियावर होतेय. यासोबतच आणखी एकाच्या चाहताने त्याला क्रिकेटर विराट कोहलीबद्दल प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना शाहरुखने लिहिलं, ‘आय लव विराट कोहली. वो मेरे अपने है और मै हमेशा उनकी सलामत की दुवा करता हुँ. भाई दामाद जैसा है हमारा. (आय लव विराट कोहली, तो माझा आपलाच आहे आणि मी नेहमीच त्याच्या भल्यासाठी प्रार्थना करतो. तो मला माझ्या जावयासारखा आहे.) शाहरुखच्या जवान या चित्रपटाने देशभरात आतापर्यंत 571 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.