AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिंकू राजगुरूच्या ‘सैराट’विषयी काय म्हणाला आयुषमान खुराना? व्यक्त केली मोठी इच्छा

प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांबद्दल बोलताना अभिनेता आयुषमान खुरानाने नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटाविषयी वक्तव्य केलं. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात त्याने त्याच्या मनातील इच्छा बोलून दाखवली.

रिंकू राजगुरूच्या 'सैराट'विषयी काय म्हणाला आयुषमान खुराना? व्यक्त केली मोठी इच्छा
Ayushmann Khurrana and Rinku RajguruImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 19, 2024 | 3:57 PM
Share

मुंबई : 19 मार्च 2024 | “केवळ हिंदी चित्रपटच नव्हे तर प्रत्येक प्रादेशिक भाषेतील चित्रपट हे यशस्वी होत आहेत. अनेक प्रादेशिक चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर धमाल उडवली आहे. तेव्हा ‘सैराट’सारखी वेगळी कथा असल्यास मला मराठी चित्रपटात काम करायला नक्कीच आवडेल,” अशी इच्छा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता अभिनेता आयुषमान खुरानाने बोलून दाखवली. सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात त्याने हे वक्तव्य केलं. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयुषमान खुरानाचा पत्रकार संघात वार्तालाप पार पडला. यावेळी त्याने पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. चित्रपटातील करिअरची सुरूवात ते राष्ट्रीय पुरस्कारपर्यंतचा 12 वर्षांचा प्रवास यावेळी आयुषमानने उलगडला.

आयुषमान पुढे म्हणाला, “कोणत्याही चित्रपटात काम करताना तो हिट होईल, या उद्देशाने मी कधीच काम करीत नाही. जी कथा कधीच पडद्यावर आलेली नाही, प्रेक्षकांसाठी वेगळी आणि नवीनच असेल आणि नवीन काहीतरी करायचं या विचारानेच मी काम करतो. चंदीगड ही माझी जन्मभूमी असली तरी मुंबई ही माझी कर्मभूमी आहे. सगळेजण स्वप्न घेऊन मुंबईत येतात तसाच मी मुंबईत आलो आणि आता मी मुंबईकर आहे.”

“राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. पुरस्कार मिळावा या उद्देशाने मी चित्रपटात कधीच काम करीत नाही. काम केलेलंही नाही. प्रेक्षकांना आवडेल, भावेल अशाच नवनवीन भूमिका साकारण्याचा प्रयत्न मी करत असतो. नवीन दिग्दर्शकांबरोबर काम करूनच आपण अनेक हिट चित्रपट दिले, नवीन दिग्दर्शकाकडे रिस्क घेण्याची क्षमता असते,” असंही तो पुढे म्हणाला.

यावेळी आयुषमानने ‘आलमारी की खुशबू’ ही आपली कविता सादर केली. तेव्हा उपस्थितांकडून त्याला उत्स्फूर्त दाद मिळाली. या कार्यक्रमात पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांच्या हस्ते आयुषमानचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि आकर्षक सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. वाबळे यांनी आयुषमानचाचा गौरव ‘स्टार ऑफ द डिकेड’ (दशकातील सर्वोत्तम अभिनेता) अशा शब्दांत केला. प्रास्ताविक कार्यवाह संदीप चव्हाण तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर यांनी केलं. याप्रसंगी मंचावर विश्वस्त वैजयंती कुलकर्णी-आपटे आणि राही भिडे उपस्थित होत्या.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था