Amitabh Bachchan : बच्चन कुटुंबातील सर्वात गरीब व्यक्तीचं नाव माहीत आहे का ? नेटवर्थ फक्त…

Amitabh Bachchan : महानायक अमिताभ बच्चन, ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन, सौंदर्यवती सूनबाई ऐश्वर्या राय बच्चन आणि आता लाजका नातू अगस्त्य नंदा... बच्चन कुटुंबात 1 नव्हे तब्बल 5 कलाकार यआहे जे मोठा पडदा गाजवत असतात. बच्चन कुटुंबियांच खाणं-पिण, त्यांच्या आवडीनिवडी, ते फोन कोणता वापरतात, फिरायला कुठे जातात इथपासून ते त्यांची संपत्ती किती... चाहत्यांना या सगळ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतात. लेक श्वेता, जावई निखिल आणि नात नव्या नंदा हे जरी बॉलिवूडमध्ये कार्यरत नसले, अभिनयाच्या क्षेत्रात नसले तरी त्यांच्याबद्दलही चाहत्यांच्या मनात उत्सुकता असते. 83 वर्षांचे अमिताभ ते टीनएजर नात आराध्या बच्चन पर्यंत बच्चन कुटुंबाचे लाखो फॅन आहेत.त्यांच्या संपत्तीबद्दल जाणून घेऊया.

| Updated on: Nov 06, 2025 | 10:14 AM
1 / 8
गेली अनेक दशकं मोठा पडदा, तसेच छोटा पडद्यावर केबीसीमधून अप्रतिम सूत्रसंचालन करणारे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्याबद्दल माहीत नाही असा माणूस विरळाच. बिग बी यांच्या प्रत्येक अपडेट्स जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. बिग बी अजूमही कार्यरत असून ते एकेका चित्रपटासाठी, केबीसीच्या एका एपिसोडसाठी कोट्यवधी रुपये आकारतात. त्यांची कमाई आणि नेटवर्थ हे प्रचंड आहे. पण याच बच्चन कुटुंबातील सर्वात गरीब व्यक्ती कोण आहे याचा विचार तुम्ही कधी केला आहे का  ? चला जाणून घेऊया.

2 / 8
बिग बी -  11 ऑक्टोबर 1942 साली अलाहाबाद येथे जन्मलेले बिग बी हे आता 83 वर्षांचे आहेत. आजही ते त्याच जोमाने चित्रपटात काम करतात, केबीसीचे होस्ट म्हणूनही वावरतात. त्यांचा पहिला पगार फक्त 500 रुपये होता. पण आता एका एका प्रोजेक्टसाठी ते कोट्यवधी रुपये फी आकारतात. रिपोर्ट्सनुसार, अमिताभ यांचे नेटवर्थ 3 हजार 190 कोटी रुपये इतके आहे. त्यांच्याकडे रोल्स रॉयस, ऑडी, रेंज रोव्हर यांसारख्या आलिशान गाड्या आहेत. मुंबईत त्यांचे अनेक बंगले, प्रॉपर्टीज असून नुकतीच त्यांनी अलिबागमध्येही काही प्लॉट खरेदी केलेत.

3 / 8
जया बच्चन - अमिताभ यांची पत्नी , जया बच्चन यांही नामवंत अभिनेत्री असून त्यांचीही रग्गड कमाई आहे. आजही त्या अनेक चित्रपटांत काम करतात, काही काळापूर्वी रिलीज झालेल्या रॉकी और रानी की प्रेमकहानीमधील त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती. कमाईच्या बाबतीच जया बच्चन या तिसऱ्या स्थानी आहेत. रिपोर्ट्सनुसार, जया बच्चन यांचे 163 कोटी आहे.

4 / 8
ऐश्वर्या राय बच्चन - सौंदर्यवती, सुपरस्टार ऐश्वर्या राय ही बच्चन कुटुंबाची सून. 2007 साली तिचे अभिषेकशी लग्न झालं. सध्या ती मोठ्या पडद्यावर फार दिसत नसली तरी ब्रँड एंडोर्समेंटमधून तिची बरीच कमाई होते. रिपोर्ट्सनुसार,कमाईच्या बाबतीत ऐश्वर्या ही बच्चन कुटुंबात दुसऱ्या स्थानी आहे. तिचे नेटवर्थ हे 900 कोटींच्या आसपास आहे.

5 / 8
अभिषेक बच्चन - बॉलिवूड कलाकार आणि बिग बी यांचा मुलगा अभिषेक हाही नामवंत अभिनेता आहे. नुकताच त्याला आय वाँट टू टॉक या चित्रपटातील उत्तम कामासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्याच्या कामाचं खूप कौतुक करण्यात आलं. अभिषेक हाँ फक्त अभिनयातूनच कमाई करत नाही तर प्रो कबड्डी टीमचा तसेच फुटबॉल संघाचा माल आहे. ब्रँड एंडोर्समेंटमधूनही त्यांची तगडी कमाई होते. अहवालांनुसार, अभिषेकचं नेटवर्थ हे 200 कोटींच्या आसपास आहे.

6 / 8
श्वेता बच्चन - अमिताभ व जया बच्चन यांची लाडकी लेक श्वेता बच्चन ही चित्रपटसृष्टीत कार्यरत नाही मात्र तरीही ती खूप चर्चेत असते. ती लेखिका, उद्योजिका आहे. MxS या ब्रँडमधूनही कमाई करते. तिचे पती निखिल नंदा हे प्रसिद्ध उद्योजक आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, श्वेताकडे 150   ते 170 कोटींच्या आसपास संपत्ती आहे. तिच्याकडे 50 कोटींचा बंगला आहे, जो तिचे वडील, अर्थात अणिताभ बच्चन यांनी तिला गिफ्ट दिला होता.

7 / 8
नव्या नंदा - अमिताभ यांची लाडकी नात म्हणजेच श्वेता आणि निखील नंदा यांची लेक नव्या नंदा दीदेखील आईप्रमाणेच ग्लॅमर वर्ल्ड पासून दूर असते. नुकतंच एका मुलाखतीत नव्याने बॉलिवूडपासून दूर राहून व्यवसाय आणि सामाजिक कार्यात करिअर करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र असं असलं तरी ती बरीच श्रीमंत आहे.  नव्या नंदा ही तिच्या कौटुंबिक व्यवसायाच्या पलीकडे पाहते. ती महिला-केंद्रित आरोग्य तंत्रज्ञान कंपनी आरा हेल्थची सह-संस्थापक आहे. जी भारतातील महिलांसाठी परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपाययोजना प्रदान करते. तसेच नव्या ही प्रोजेक्ट नवेली या एका नॉन-प्रॉफिट संस्थेची संस्थापक देखील आहे. तिचे नेटवर्थही शेकडो कोटी आहे.

8 / 8