
बहुप्रतिक्षित पुष्पा 2 हा अखेर गेल्या आठवड्यात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला असून त्याने अक्षरश: धूमाकूळ घातला आहे. तीन दिवसांच्या आतच या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स मोडत 621 कोटी रुपयांचे कलेक्शन केलं आहे.
एवढंच नव्हे तर या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांत 205 कोटींचा गल्ला पार केला आहे.पुष्पा 2 बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे आणि चौथ्या दिवसाचे कलेक्शन समोर येणं अद्याप बाकी आहे. पण याचदरम्यान, चित्रपटातील एक अभिनेत्री सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. खरंतर याा चित्रपटात तिचं फार काम नाही, अवघ्या 4 मिनिटांचा रोल आहे , त्यात तिला संवादही नाही.पण तरीही तिचं काम खूप चांगलं झालंय आणि लोकांना तिचाय चेहराही लक्षात राहते. ती अभिनेत्री म्हणजे आंचल मुंजाल.
आठवली का ? ही तीच अभिनेत्री आहे जिने ‘बड़े अच्छे लगते हैं’ या प्रसिद्ध मालिकेत पिहूची भूमिका साकारली होती. टीव्हीत काम करत तिने अभिनयात पदार्पण केलं. शन्नो की शादी, परवरिश अशा अनेक मालिकांत झळकली. पण बड़े अच्छे लगते हैं मधील कामामुळे तिला खरी ओळख मिळाली अन् ती घराघरांत पोहोचली. तसेच वुई आर फॅमिली, आरक्षण, घायल अगेन सारख्या चित्रपटातही तिने दिग्गज अभिनेत्यांसोबत तिने काम केलंय. पण आता तिला मोठा ब्रेक मिळाला असून पुष्पा 2 सारख्या मोठ्या चित्रपटात ती झळकली आहे.
कसं मिळालं पुष्पा 2 मध्ये काम ?
पुष्पा हा ओरिजनल चित्रपट रिलीज झाला तेव्हा त्यातील एका गाण्यावर तिने रील बनवलं होतं, जे प्रचंड लोकप्रियही झालं. मग एके दिवशी तिला जो कॉल ऑला ते ऐकन तिचा कानांवर विश्वासच बसेना. पुष्पा 2 चे दिग्दर्शक सुकुमार यांची तिला चित्रपटात कास्ट करायीच इच्छा असल्याचे तिला सांगण्यात आलं. हा एक प्रँक कॉल असेल असं आधी तिला वाटलं होतं, पण पुन्हा एकदा कॉल आल्यावर विश्वास बसला आणि आनंद गगनात मावेना असं आंचलने सांगितलं. अशाप्रकारे ती हैदराबादच्या रामोजी स्टुडिओत पोहोचली आणि तिथे चित्रपटाचे शूटिंग केले. अवघ्या आठ सेकंदांच्या इंस्टाग्राम रीलने आंचलचे नशीब बदलले.
एवढंच नव्हे तर आंचलने सांगितले की, तिने या चित्रपटासाठी सात दिवस शूटिंग केले असून तिची आठ मिनिटांची भूमिका होती. त्याच तिच्या वाट्याला काही संवादही होते. पण नंतर तिची ही भूमिका केवळ चार मिनिटांचीच करण्याच आली. पण तरीही अवघ्या चार मिनिटांच्या भूमिकेने आंचल प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. पुष्पा 2 चे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. यामध्ये आंचल सौरभ सचदेवासोबत दिसली आहे.