AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम कपूरने रचलेला वडिलांच्या मृत्यूचा फुलप्रूफ प्लान, ICU मध्ये दाखल तर केलं पण…, त्या दिवसानंतर आई – बहिणीने संबंध संपवले

अभिनेता राम कपूर याने स्वतःच्या वडिलांच्या मृत्यूसाठी फुलप्रूफ प्लान रचलेला. अभिनेत्याने वडिलांना ICU मध्ये दाखल तर केलं, पण त्यापुढे जे काही झालं ते फार धक्कादायक होतं. त्या दिवसानंतर अभिनेत्याच्या आईने आणि बहिणीने सर्व संबंध संपवले.

राम कपूरने रचलेला वडिलांच्या मृत्यूचा फुलप्रूफ प्लान, ICU मध्ये दाखल तर केलं पण..., त्या दिवसानंतर आई - बहिणीने संबंध संपवले
Ram Kapoor
| Updated on: Jul 28, 2026 | 8:11 AM
Share

अभिनेता राम कपूर सध्या ‘लॉक अप 2’ या शोमुळे चर्चेत आहे. नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये अभिनेत्याने फार मोठं सत्य सांगितलं आहे. ते सांगताना अभिनेत्याच्या डोळ्यात पाणी देखील आहे. राम म्हणाला ‘मी माझ्या वडिलांच्या मृत्यूची पूर्व योजना आखली होती…’, सांगायचं झालं तर अभिनेत्याचे वडील कॅन्सरशी झुंज देत होते, त्यांनी या गंभीर आजारावर मात देखील केली. पण वयाच्या 73 व्या वर्षी त्यांना पुन्हा कॅन्सरचं निदान झालं. अशात त्यांनी आजारावर उपचार घ्यायचे नव्हते… अशा परिस्थितीत वडिलांच्या एका फोननंतर असं काही झालं, ज्यानंतर राम कपूर याच्या आईने आणि बहिणीने अभिनेत्यासोबत असलेले सर्व संबंध मोडले.

राम कपूर म्हणाला, ‘कोरोना काळात माझ्या वडिलांना पुन्हा कॅन्सरचं निदान झालं. त्यांनी गौतमीला फोन केला आणि तिला सांगितलं मला रामशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. फोनवर वडिलांसोबत माझी चर्चा झाली आणि खरं तर, त्यांनी ठरवलं होतं की, आता त्यांना या गंभीर आजाराशी लढायचं नाही. त्यांना या जगाचा निरोप घ्यायचा होता.

अभिनेता पुढे म्हणाला, ‘पण त्यांना एकट्यांना कोणता मोठा निर्णय घेण्यास भीती वाटत होती. कोणाच माहिती पडू नये, अशीच त्यांची इच्छा होती, पण त्यांना मी त्यांच्याजवळ हवा होतो… त्यामुळे मला त्यांना स्पष्ट विचारलं की, ‘तू माझी मदत करणार आहेस का? ते मला म्हणाले, ‘तू माझी मदत केली नाही तर, मी स्वतःच मोठं पाऊल उचलेल…’

‘वडिलांनी असं म्हटल्यानंतर माझ्याकडे कोणता दुसरा पर्याय राहिला नाही… त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आलं. तेव्हा मी देखील त्यांच्यासोबत होतो. त्यांना ICU मध्ये दाखल तर केलं, पण कोणालाच माहिती नव्हतं की, त्यांच्यावर कोणते उपचार सुरु नाहीत…’, वडिलांच्या निधनानंतर राम कपूर यांच्या आईने आणि बहिणीने त्यांच्यासोबत असलेले सर्व संबंध संपवले.

अभिनेता म्हणाला, ‘पाच वर्षांपेक्षा जास्त दिवस झाले असतील, प्रत्येक जण राजा सारखा जगत आहे. पण ते तर एखाद्या राजाप्रमाणेच गेले… त्यांच्यामुळे आज मला मृत्यूची भीती राहिलेली नाही.’, सांगायचं झालं तर, ‘लॉकअप 2 ‘ मध्ये राम कपूर त्याच्या खासगी आयु्ष्याबद्दल फार मोठे खुलासे करताना दिसत आहे.

Follow Us
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा