Ramayana: रावणाला पाहू शकलो नाही, मला आता पाप लागणार…बादशाह ‘रामायण’ पाहताच असं का म्हणाला?
Badshah Review Ramayana Movie: गायक बादशाहने एक रिव्ह्यू व्हिडिओ शेअर केला आहे,. हा रिव्ह्यू रामायण चित्रपटावर त्याने केला आहे. तो काय म्हणाला पाहा...

Ramayana Movie: साई पल्लवी, रणबीर कपूर, यश आणि रवी दुबे यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘रामायण’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चर्चा ही घोषणा केल्यापासून होत आहे. या चित्रपटाबद्दल अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातच आता गायक बादशाहने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं नुकतंच मुंबईत पार पडलेल्या रामायणा चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. आता व्हिडिओच्या माध्यमातून त्यानं रामायण चित्रपटाचा रिव्ह्यू दिला आहे.
बादशाह काय म्हणाला?
बादशाहने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना उद्देशून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो म्हणतो, “मला तुमच्याशी एका खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे की मी काल ‘रामायण’ पाहिलं. त्यातील प्रत्येक पात्राने अभिनय केला नाही तर ते त्या पात्राशी एकरूप झाले आहेत, मग ती रामाची भूमिका साकारणारा रणबीर कपूर असो, सीतेची भूमिका साकारणारी साई पल्लवी असो, किंवा लक्ष्मणाची भूमिका साकारणारा रवी दुबे असो, विलक्षण काम केले आहे. यांनी साकारलेली पात्र सर्वांना आवडेल, तरीही माझ्याकडून सुरुवातीला झालेली रावणाची एन्ट्री मिस झाली. आता मला पाप लागेल.”
बादशाह म्हणाला की, “तुम्ही हा चित्रपट नक्कीच बघायला हवा. “प्रत्येक फ्रेम अप्रतिम आहे. पात्रं अगदी खरी वाटतात. ही कथा लहानपणापासून माहीत असूनही, चित्रपट पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले. पार्श्वसंगीत अप्रतिम आहे. रणबीर, साई पल्लवी, रवी दुबे, यश, लारा दत्ता, अरुण गोविल, रकुल. प्रत्येकाने उत्तम काम केले आहे. जटायूचा सीन अप्रतिम आहे. आणि ‘धरती आंबार’ची थीम सुरू होण्याची वाट बघा. टाळ्यांचा कडकडाट होणार आहे, कृपया जाऊन हा चित्रपट बघा.”
नितेश तिवारी यांनी हा चित्रपट अंदाजे ४,००० कोटी रुपयांच्या भव्य बजेटमध्ये बनवला आहे. चित्रपटाच्या व्हिज्युअल इफेक्ट्सची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. आठ वेळा ऑस्कर-विजेत्या DNEG स्टुडिओने व्हिज्युअल्सचे काम हाताळले आहे. चित्रपटाच्या जगभरातील प्रदर्शनासाठी सोनी पिक्चर्स टेलिव्हिजनसोबत भागीदारी करण्यात आली आहे. निर्मात्यांच्या मते, हा चित्रपट अंदाजे ७०,००० स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्याची योजना आहे.