गुणरत्न सदावर्ते सुपारी बहाद्दर, मेंटल… मराठा आंदोलकाचा थेट इशारा, तू कितीही पोलीस संरक्षण पण..
गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. मराठा आंदोलक महेश डोंगरे यांनी ही टीका केली. एकनाथ शिंदे यांनी सदावर्तेला कसे वाचवले आणि तेच आज त्यांच्यावर टीका करत असल्याचेही म्हटले.

गुणरत्न सदावर्ते गेल्या काही दिवसांपासून सतत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करत आहेत. जरांगे ज्यावेळी मुंबईत आले होते, त्यावेळीही जरांगेंवर निशाना सदावर्ते यांनी साधला होता. प्रदीप पूर्णेकर प्रकरणात गुणरत्न सदावर्ते थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत होते. हेच नाही तर पूर्णेकर कुटुंबियांची इच्छा आहे की, मी त्यांची केस लढावी. गुणरत्न सदावर्ते सतत मनोज जरांगे यांच्यावर टीका करत असतानाच मराठा आंदोलक महेश डोंगरे यांनी गुणरत्न सदावर्ते यांना इशारा दिला. येणाऱ्या काळात कितीही पोलीस संरक्षण दिले तरी चोप देणार म्हणजे देणार, असा थेट इशारा मराठा आंदोलक महेश डोंगरे यांनी गुणरत्न सदावर्ते यांना दिला. गुणरत्न सदावर्ते हा मेंटल झाला असून त्याच्यासाठी मिरजच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये आम्ही बेड बुक केला आहे, असेही त्यांनी म्हटले.
पुढे महेश डोंगरे यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांच्यावर बोलण्यासाठी कोणाची सुपारी घेतली हे आख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. सदावर्ते सुपारी बहाद्दर, मेंटल आहे. घरात गाढव पाळणारा आहे. महाविकास आघाडीमध्ये तुला जेलमध्ये टाकल्यावर तुझी घरची जर्शी गाय, शिंदे साहेबांना वाचवा म्हणून वर्षा बंगल्याच्या बाहेर किती फिरत होती, असे म्हणत थेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका करण्यात आली.
एस टी महामंडळातील लोक तुला चपलेने मारत होते तेव्हा तू शिंदेंचे पाय धरले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेत भ्रष्टाचार केला, त्यानंतर एकनाथ शिंदेंचे नेतृत्वात ही बँक निवडून आल्यानंतर तुझे पित्त उसळले. सदावर्ते औकातीत राहा, येणाऱ्या काळात तुला नक्कीच चोप देणार आहे, असल्याचे डोंगरे यांनी म्हटले.
त्यांनी पुढे म्हटले की, मुख्यमंत्री साहेब तुम्हाला विनंती आहे की, सदावर्तेला आवर घाला. सरकारमधील मंत्र्यांवर बोलतो जातीत तेढ निर्माण करतो. सदावर्ते हा डुकराची अवलाद आहे डुकराप्रमाणे कुठेही जाऊन तोंड घालतो. येणाऱ्या काळात तू कितीही पोलीस संरक्षण घेऊन फिर तुला मारणार म्हणजे मारणार.
