Ramayana: ‘रामायण’ चित्रपटाने मोडले सर्व रेकॉर्ड, कमाईचा आकडा वाचून चक्रावून जाल
Ramayana Advance Booking: रणबीर कपूरच्या ‘रामायण’ या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये खळबळ माजली आहे. या चित्रपटाने एकूण प्री-सेलमधून १३० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

रणबीर कपूर महत्त्वाच्या भूमिकेत असणारा ‘रामायण’ हा सिनेमा गुरुवारी ५ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाली आहे. त्याआधी या चित्रपटाला अॅडव्हान्स बुकिंगमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. ट्रेड ट्रॅकर ‘सॅकनिल्क’च्या मते, चित्रपटाची २९ लाखांहून अधिक तिकिटे अॅडव्हान्समध्ये विकली गेली आहेत आणि भारतात पहिल्याच दिवशी १०० कोटी रुपये पार करण्याची अपेक्षा आहे. अॅडव्हान्स बुकिंगचे हे मजबूत आकडे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची प्रचंड उत्सुकता दर्शवतात, ज्यामुळे बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची शानदार सुरुवात होण्याची शक्यता आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’मध्ये रणबीर कपूर भगवान राम, साई पल्लवी सीता, रवी दुबे लक्ष्मण आणि यश रावण या भूमिकेत दिसणार आहेत. चला पाहूया अॅडव्हान्स तिकीट विक्रीतून या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे.
‘रामायण’च्या अॅडव्हान्स बुकिंगने किती कमावले?
ट्रेड ट्रॅकर ‘सॅकनिल्क’च्या आकड्यांनुसार, ‘रामायण पार्ट १’ (ज्याला ‘रामायण: राईज ऑफ अ लेजेंड’ असेही म्हटले जात आहे)ने रिलीजपूर्वीच भारतभर उत्कृष्ट व्यवसाय केला आहे. चित्रपटाच्या थिएटर रिलीजपूर्वीच चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगने १०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत, ३६.३७ लाख तिकिटांच्या विक्रीतून चित्रपटाने सुरुवातीच्या ६ दिवसांच्या अॅडव्हान्स बुकिंगमधून १३०.१२ कोटी रुपये कमाई केली आहे (ब्लॉक केलेल्या जागा वगळता हा आकडा १०५.१२ कोटी रुपये आहे).
‘रामायण’ची पहिल्या दिवसाची कमाई
‘रामायण पार्ट १’ची पहिल्या दिवसाची अॅडव्हान्स बुकिंगची कमाईही ५० कोटींपार पोहोचली आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘रामायण पार्ट १’ने गुरुवार सकाळी ७ वाजेपर्यंत त्याच्या २६ हजार ६१५ शोजसाठी १४.०५ लाख तिकिटांची प्री-सेल झाली आहे. त्यामुळे ब्लॉक सीट्सशिवाय प्री-सेलमधून ४२.९६ कोटी कमाई झाली आहे. तर ब्लॉक सीट्ससह प्री-सेलची कमाई ५०.०८ कोटींवर पोहोचली आहे.
रामायण सिनेमाविषयी
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’मध्ये रणबीर कपूर भगवान राम, साई पल्लवी सीता आणि यश रावण या भूमिकेत आहेत. चित्रपटात सनी देओल भगवान हनुमान आणि रवि दुबे लक्ष्मण या भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटाच्या स्टार कास्टमध्ये अनेक प्रसिद्ध कलाकारांचा समावेश आहे, ज्यात राजा दशरथ म्हणून अरुण गोविल, राणी कैकेयी म्हणून लारा दत्ता आणि शूर्पणखा म्हणून रकुल प्रीत सिंह यांची महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि इंग्रजी भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे.
