घटस्फोटाच्या 2 महिन्यांनंतर ‘भाबी जी घर पर हैं’ फेम अभिनेत्रीच्या पूर्व पतीचं निधन, मृत्यूचं कारण समोर

Shubhangi Atre Ex-Husband passed away: 'भाबी जी घर पर हैं' फेम अभिनेत्रीच्या पूर्व पतीचं निधन, लग्नाच्या 22 वर्षांनंतर घटस्फोटाचा निर्णय, विभक्त होताच 2 महिन्यांतर त्याने घेतला अखेरचा श्वास, निधनाचं कारण समोर..., पूर्व पतीच्या निधनानंतर अभिनेत्री दुःख व्यक्त करत म्हणाली...

घटस्फोटाच्या 2 महिन्यांनंतर भाबी जी घर पर हैं फेम अभिनेत्रीच्या पूर्व पतीचं निधन, मृत्यूचं कारण समोर
फाईल फोटो
| Updated on: Apr 22, 2025 | 3:18 PM

Shubhangi Atre Ex-Husband passed away: ‘भाभी जी घर पर है’ फेम अभिनेत्री शुभांगी अत्रे हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शुभांगीचा पूर्व पती पियुष पुरी याचं निधन झालं आहे. 19 एप्रिल रोजी अभिनेत्रीच्या पतीने अखेरचा श्वास घेतला आहे. घटस्फोटाच्या 2 महिन्यांनंतर पियुष याने अखेरचा श्वास घेतला. लग्नाच्या 22 वर्षांनंतर शुभांगी आणि पियुष यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2003 मध्ये त्यांचं लग्न झालं होतं. तर 5 फेब्रुवारी 2025 दोघांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली.

पियुष यांच्या निधनाचं कारण देखील समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तो गंभीर आजाराने त्रस्त होता. सिरोसिस या गंभीर आजारावर रुग्णालयात उपचार सुरु असताना पियुष याने अखेरचा श्वास घेतला. पूर्व पतीच्या निधनानंतर अभिनेत्री दुःख देखील व्यक्त केलं.

अभिनेत्री म्हणाली, ‘या कठीण काळात तुमची सहानुभूती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. याबद्दल बोलण्यासाठी तुम्ही मला थोडा वेळ द्यावा अशी माझी इच्छा आहे….’ एवढंच नाही तर, शुभांगी आणि पियूष यांच्यामधील संवाद देखील बंद झालेला होतं. अखेर पूर्व पतीच्या निधनानंतर स्वतःला सावरत अभिनेत्रीने पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.

घटस्फोटाबद्दल काय म्हणाली होती शुभांगी?

खासगी आयुष्याबद्दल अभिनेत्री म्हणाली होती, ‘ते खूप वेदनादायक होतं. मी माझ्या नात्याला सर्वस्व दिलं. कालांतराने, पियुष आणि माझ्यात मतभेद निर्माण झाले. पण, आता मी त्या लग्नातून बाहेर पडली आहे आणि मला चांगलं वाटतंय, जणू काही माझ्या मनातून एक जड ओझं उतरलं आहे…. अशी भावना आता माझ्या मनात आहे… आता मला माझ्या मुलीवर पूर्ण लक्ष द्यायचं आहे… मला माझ्या मुलीला चांगलं आयुष्य द्यायचं आहे…’

पुढे अभिनेत्री म्हणाली होती, ‘गेल्या वर्षभरापासून आम्ही वेगळे राहत आहोत. पियुष आणि मी आमचं लग्न वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. परस्पर आदर, विश्वास आणि मैत्री हे मजबूत विवाहाचा पाया आहेत. पण, आम्हाला जाणवलं की आपण आपले मतभेद दूर करु शकतो.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.