‘मैंने प्यार किया’मध्ये भाग्यश्रीने सलमानला किस करण्यास का दिला होता नकार? समोर आलं कारण

भाग्यश्रीच्या नकारामुळे सलमानसोबतच्या किसिंग सीनमध्ये केले बदल; दिग्दर्शकांनी सांगितला किस्सा

मैंने प्यार कियामध्ये भाग्यश्रीने सलमानला किस करण्यास का दिला होता नकार? समोर आलं कारण
Maine Pyar Kia
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 28, 2022 | 6:40 PM

मुंबई- 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली. या चित्रपटातील गाणी, कलाकारांचं अभिनय, कथानक सर्वच गोष्टी प्रेक्षकांना आवडल्या होत्या. अभिनेत्री भाग्यश्रीच्या करिअरमधील हा सर्वांत मोठा चित्रपट होता. याच चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यातील सलमान आणि भाग्यश्रीच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं.

‘मैने प्यार किया’मधील भाग्यश्री आणि सलमानचा किसिंग सीनसुद्धा विशेष चर्चेत होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी किसिंग सीनमागचा खास किस्सा सांगितला. त्यावेळी भाग्यश्रीने चित्रपटातील किसिंग सीनला नकार दिला होता. त्या नकारामागचं कारणसुद्धा त्यांनी सांगितलं.

पिंकविला या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सूरज म्हणाले, “आम्हाला चित्रपटात किसिंग सीन शूट करायचा होता. मात्र भाग्यश्री आणि तिच्या कुटुंबीयांकडून त्याला विरोध होता. मी खूप आधीच चित्रपटाची स्क्रीप्ट लिहिली होती. मात्र नंतर त्यात मला बदल करावे लागले. किसिंग सीन नेमका कसा शूट करावा हेच मला कळत नव्हतं. त्यावेळी फुलांच्या आधारे तसे सीन्स शूट केले जायचे. पण मला ते पटायचं नाही. सुदैवाने सेटवर मला एक काच दिसली. एकेदिवशी सेटवरचा दरवाजा बंद होता आणि अचानक काचेचा दरवाजा माझ्यासमोर आला. तेव्हाच मला तो किसिंग सीन सुचला.”

मैंने प्यार किया या चित्रपटानंतर सूरज बडजात्या यांनी हम आपके है कौन, हम साथ साथ है, मै प्रेम की दिवानी हूँ, विवाह आणि प्रेम रतन धन पायो यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. आता जवळपास सात वर्षांनंतर ते दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन करत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या आगामी ‘उंचाई’ या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे.