कॉमेडियन भारती सिंग पती हर्षपेक्षा दुप्पट कमावते; दोघांमध्ये पैशांवरून वाद होतात? भारतीनेच केला खुलासा

भारती आणि हर्ष ही एक हीट जोडी आहे. भारती सिंगला कोणत्याही ओळखीची आवश्यकता नसते. तसेच ती आणि  तिचा पती हर्ष हे कामाच्याबाबतही फार चर्चेत असतात. पण त्यांच्या मानधनातही नक्कीच तेवढा फरक आहे. भारती ही हर्षपेक्षा कितीतरी पटीने जास्त कमावते. आणि याचा खुलासा तिने स्वत:च एका शोमध्ये केला आहे.  

कॉमेडियन भारती सिंग पती हर्षपेक्षा दुप्पट कमावते; दोघांमध्ये पैशांवरून वाद होतात? भारतीनेच केला खुलासा
Bharti Singh Earnings, How Much Does She Make Per Show
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Aug 20, 2025 | 3:51 PM

कॉमेडियन अभिनेत्री भारती सिंगला आता कोणत्याही ओळखीची आवश्यकता नाही. तिने मेहनतीने या इंडस्ट्रीमध्ये स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे. हे स्थान मिळवण्यासाठी तिने खूप संघर्ष केला आहे. आज भारती एक लक्झरी आयुष्य जगतेय आणि प्रचंड पैसाही कमवतेय. अभिनेत्री भारती नुकतीच राज शमानीच्या पॉडकास्टला उपस्थित राहीली होती.या पॉडकास्टमध्ये तिने तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला आहे. ज्या कदाचितच कोणालाही माहित हेत्या. भारतीने करिअरपासून ते कुटुंबापर्यंत अनेक खुलासे केले. भारतीने पॉडकास्टमध्ये सर्वांना तिच्या मानधनाबद्दलही सांगितलं.

कंगना राणौतच्या विधानावर भारतीचे उत्तर 

राज शमानी यांनी भारतीशी कंगनाने केलेल्या एका विधानाबद्दल चर्चा केली. ते म्हणाले “कंगना राणौत येथे आली होती आणि तिने म्हटले होते की जर कोणत्याही नात्यात मुलगी अधिक यशस्वी असेल, जास्त प्रसिद्धी असेल किंवा जास्त पैसे कमावते तर ते नाते चांगले राहू शकत नाही कारण मुलगा असुरक्षित राहतो. तुमच्या बाबतीत काय दृश्य आहे?”

मी जर एका शोसाठी 10 लाख घेते तर तो 1.5 लाख घेत असे.

कंगनाच्या या विधानावर भारतीने खूप छान उत्तर दिले. ती म्हणाली “लोकांनी हे अनेक वेळा केलं आहे. आजही आपण काम करतो, जसं हर्ष एक लेखक आहे. आतापर्यंत बॅकस्टेज लोकांना खूप पैसे मिळतात पण पूर्वी ते इतके नव्हते. जसं की, मी जर एका शोसाठी 10 लाख घेते तर तो 1.5 लाख घेत असे.

Bharti Singh Instagram


हर्ष आणि मी जरी एकत्र करत असलो तरीही आमच्यात तो मानधनाचा फरक आहे

भारती पुढे म्हणाली “तो खूप मोठा फरक होता आणि आजही पैशात खूप मोठा फरक आहे. आजही जेव्हा मी आणि हर्ष आपापलं काम करतो तेव्हा खूप मोठा फरक दिसून येतो. हर्ष आणि मी जरी एकत्र करत असलो तरीही आमच्यात तो मानधनाचा फरक असतो. पण हर्ष कधीच असा विचार करत नाही की कमी मानधन आहे तर मी तुझ्यासोबत काम करणार नाही. तू असं का केलेसं किंवा मी म्हणेल तेच होईल वैगरे असं आमच्यात कधीच झालं नाही. तो त्याचं काम करतो आणि मी माझं. आमच्यात यावरून तरी कधीही काहीही वाद किंवा मतभेद झाले नाही.” असं म्हणत भारतीने हर्ष आणि तिच्या नात्यातील एक समजुतदार बाजूही समजावून सांगितली. तसेच हर्ष तिला कायम सपोर्ट करत असतो असही ती म्हणाली.

भारती आणि हर्ष ही एक हीट जोडी आहे

दरम्यान आता भारती आणि हर्ष ही एक हीट जोडी आहे. दोघेही एकत्र पॉडकास्ट देखील करतात. त्यांच्या पॉडकास्टसोबतच लोकांना त्यांचे व्लॉग देखील खूप आवडतात. भारती अलीकडेच लाफ्टर शेफ्स 2 चे सूत्रसंचालन करताना दिसली. या शोसाठी ती मोठी रक्कम घेत असे.