
लबूबू डॉल्सची असलेली क्रेझ सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. अनेकांकडे ही बाहुली आहे. आधी हॉलिवूड आणि आता बॉलिवूडमध्ये देखील लबूबू डॉक्लची असलेली क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटींना देखील लबूबू डॉल विकत घेतली. पण अनेकांकडून असं कळलं आहे की, भयानक दिसणारी ही बाहुली पनौती देखील आहे. ही बाहुली जिथे जाते, तिथे काहीतर वाईट होतं. नुकताच कॉमेडियन भारती सिंग हिला देखील असाच एक अनुभव आला. ज्यामुळे तिने बाहुलीच जाळली…
भारतीने कॅमेऱ्यासमोर तिच्या मुलाची बाहुली जाळताना त्यामागील कारण सांगितलं. तिने सांगितलं की तिचा पती हर्ष लिंबाचियाने तिच्या मुलासाठी ही बाहुली विकत घेतली होती. पण लबूबू बाहुली घरी येताच तिच्या मुलाच्या वागणुकीत अनेक बदल झाले. भारतीचा मुलगा अधिक रागीट झाला.
व्हिडीओ पोस्ट करत भारती म्हणाली, ‘लबूबू बाहुली घरी आल्यापासून गोला अधिक मस्तीखोर झाला आहे. वस्तू फेकू लागला आहे.. जोर – जोरात ओरडू देखील लागला आहे. तो कोणाचं काहीच ऐकत नाही… लबूबू बाहुली घरी आल्यानंतर सुरुवातीला मी मुलाच्या वागणुकीकडे दुर्लक्ष केलं. पण हे सत्य आहे…. अन्य लोकांनी जेव्हा लबूबू बाहुलीवर संशय व्यक्त केला तेव्हा भारती हिने लबूबू बाहुली जाळण्याचा निर्णय घेतला.
सांगायचं झालं तर, भारतीने सिंग हिने 3 – 4 वेळा बाहुली जाळण्याचा प्रयत्न केला. पण ती बाहुली जळतच नव्हती. त्यामुळे भारती देखील घाबरली… अखेर भारतीने बाहुलीला एका पेपरमध्ये गुंडाळलं आणि जाळलं… तेव्हा लबूबू बाहुली जळली. सध्या भारती हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होती.
बाहुली जळल्यानंतर भारती म्हणाली, ‘अखेर वाईट गोष्टीचा अंत आणि सत्याचा विजय झाला आहे.’ भारतीच्या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. भारती कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.. भारती सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.