कोण आहे ते लेस्बियन कपल? ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश करताच माजली खळबळ
Lesbian Couple in Bigg Boss: 'बिग बॉस'मध्ये लेस्बियन कपलची एन्ट्री, दोघींच्या एन्ट्रीनंतर सर्वत्र खळबळ... जाणूघ्या दोघींची 'लव्हस्टोरी', कुटुंबियांनी दोघींच्या नात्याला नकार दिल्यानंतर प्रकरण पोहोचलं कोर्टात, त्यानंतर...

Who is Lesbian Couple in Bigg Boss: टेलीव्हीजन विश्वातील वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सलमान खानच्या ‘बिग बॉस 19’ या रिॲलिटी शोपूर्वी आणखी एक शो सुरू झाला आहे. या शोचं नाव मल्याळम रिॲलिटी शो ‘बिग बॉस सीझन 7’ आहे. हा सीझन प्रसारित झाल्यानंतर, सर्वांच्या नजरा या शोच्या दोन स्पर्धकांवर आहेत. याचं कारण म्हणजे शोमध्ये आलेलं लेस्बियन कपल…. आदिला आणि फातिमा. तर या कपलबद्दल अधिक जाणून घ्या…
‘बिग बॉस’मध्ये लेस्बियन कपल
मोहनलालच्या ‘बिग बॉस मल्याळम सीझन 7’ मध्ये दिसणारे लेस्बियन कपल सौदी अरेबियामध्ये राहणारे आहे. त्यांची पहिली भेट देखील सौदी अरेबियामध्येच झाली होती. तेव्हा आदिला आणि फातिमा 12 वीत शिकत होत्या. एकत्र शिकत असताना दोघींमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आदिला आणि फातिमा यांचे कुटुंबिय देखील एकमेकांना ओळखत होते.
अखेर दोघींनी त्यांच्या नात्याबद्दल कुटुंबियांना सांगण्याचा निर्णय घेतला. जेव्हा दोघांनीही त्यांच्या कुटुंबियांना याबद्दल सांगितलं तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी त्याला विरोध केला. दोघांवरही दबाव आणण्यात आला. त्यानंतर दोघांनीही घर सोडण्याचा निर्णय घेतला. दोघांनाही त्यांच्या कुटुंबियांनी वेगळं केलं. पण कुटुंबियांमुळे आलेला दुरावा देखील त्यांचं प्रेम संपवू शकला नाही.
आदिलाने फातिमासोबतच्या तिच्या प्रेमाला न्यायालयात नेण्याचा निर्णय घेतला. तिने केरळ उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. याअंतर्गत तिने आरोप केला की फातिमाला तिच्या इच्छेविरुद्ध नेण्यात आलं. तिच्यावर धर्मांतर थेरपी करण्यात आली. न्यायालयाने दोघांशीही खाजगीत बोलून त्यांच्या बाजूने निकाल दिला. LGBTQ समुदायानेही त्यांच्या समर्थनार्थ पुढाकार घेतला. आता हे कपल मल्याळम ‘बिग बॉस 7’ मध्ये दिसणार आहे.
मल्याळम ‘बिग बॉस 7’ मध्ये 19 स्पर्धकांनी एन्ट्री घेतली आहे. आदिला आणि यांच्यासोबत शोमध्ये अप्पानी सारथ, सारिका, रेणु सुधी, शैथ्या, नेविन, शानवास शानू, गिजेल ठकराल, मुंशी रणजीत, रेना फातिमा, अभिलाष, बिन्नी नोबिन, आरजे बिंसी, ओनील साबू, अकबर खान, कलाभवन सारिगा, आर्यन कथूरिया यांसारखे स्पर्धक आहेत.
