AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Gas Booking : गॅस बुकिंगच्या 5 महत्त्वाच्या नियमांत बदल; जाणून घ्या तुम्हाला गॅस कधी मिळणार; नेमकं काय बदललं?

इराण-इस्रायल युद्धामुळे भारतात एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. भारतात गॅस बुकिंगच्या पाच नियमांत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे हे बदल कोणते आहेत, हे समजून घेणे गरजेचे आहे.

LPG Gas Booking : गॅस बुकिंगच्या 5 महत्त्वाच्या नियमांत बदल; जाणून घ्या तुम्हाला गॅस कधी मिळणार; नेमकं काय बदललं?
lpg gas bookingImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 16, 2026 | 3:01 PM
Share

Gas Cylinder Booking Rule : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे सध्या संपूर्ण जग होरपळले आहे. भारतातही गॅस सिलिंडरचा भाव वाढला आहे. गॅस बुकिंग केल्यावर तो वेळेवर मिळत नाहीये. गॅस सिलिंडरसाठी लोकांना कित्येक तास रांगेत उभे राहावे लागत असून मनस्ताप सहन करावा लागतोय. दरम्यान, प्रत्येकाला गॅस सिलिंडर मिळावे यासाठी सरकारने काही निर्णय घेतले आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून सरकारने एलपीजी गॅस सिलिंडर वितरणाबाबत एकूण पाच नियमांत बदल केले आहेत. हे बदल कोणते आहेत? या बदलांमुळे तुमच्या खिशावर नेमका काय परिणाम झाला? तुम्हाला कोणत्या अडचणी येऊ शकतात, हे जाणून घेऊ या…

गॅस सिलिंडरचा भाव वाढला, बुकिंगचा नियमही बदलला

केंद्र सरकारने 7 मार्च रोजीपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. ही भाववाढ साधारण सात टक्के झाली आहे. आता 14.2 किलोचा सिलिंडर 965 रुपयांना मिळत आहे. सरकारने गॅस सिलिंडरच्या बुकिंगच्या नियमातही मोठा बदल केला आहे. या नव्या नियमानुसार तुम्ही एक गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर लगेच दुसरा सिलिंडर बुक करू शकत नाही. एक गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर आता तुम्हाला दुसरा सिलिंडर 25 दिवसांनी बुक करता येणार आहे. ग्रामीण भागात हाच नियम 45 दिवसांचा आहे.

पीएनजी असेल तर गॅस सिलिंडर मिळणार नाही

एकदा गॅस बुक केल्यानंतर तुम्हाला तो 2.5 दिवसांनी मिळणार आहे. तुम्ही वर्षाला 15 गॅस सिलिंडर बुक करू शकता. सरकारने पीएनजी म्हणजे पाईप्ड नॅच्यूरल गॅस संदर्भातही एक नवा नियम केला आहे. ज्यांच्या घरी पीएनजी असेल तर त्या घरी एलपीजी गॅस ठेवता येणार नाही. म्हणजेच पीएनजी असेल तिथे एलपीजी गॅस मिळणार नाही.

काळाबाजार रोखण्यासाठी कठोर कारवाई

दरम्यान, या बदललेल्या नियमांमुळे लोकांची अडचण होत आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या संकटाला तोंड देण्यासाठी हे नियम घालून देण्यात आले आहेत. लोकांनी या नियमांना लक्षात घेऊनच नियोजन करावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. गॅस सिलिंडरच्या विक्रीचा काळाबाजार रोखण्यासाठीही सरकारकडून कठोर पावलं उचलली जात आहेत.

Follow Us
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...