AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतासाठी सर्वात मोठी गुड न्यूज… आता एलपीजी गॅसचं टेन्शन खतम, रांगा लावण्याची गरज नाही, थेट इराणमधूनच…

इराण-इस्रायल युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेले भारतीय जहाज "शिवालिक" आज45 हजार टन एलपीजी घेऊन मुंद्रा बंदरात पोहोचणार आहे. भारत सरकारच्या यशस्वी राजनैतिक प्रयत्नांमुळे, युद्धक्षेत्रातून जहाजाचा सुरक्षित मार्ग मिळाल्याने देशातील सध्या सुरू असलेल्या एलपीजी संकटातून मुक्तता मिळण्याची अपेक्षा आहे.

भारतासाठी सर्वात मोठी गुड न्यूज... आता एलपीजी गॅसचं टेन्शन खतम, रांगा लावण्याची गरज नाही, थेट इराणमधूनच...
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 16, 2026 | 12:56 PM
Share

पश्चिम आशियातील सध्याच्या तणावामुळे अख्ख जग चिंतेत आहे. इराण किंवा अमेरिका-इस्रायलयांच्यात कोणीच माघार घ्यायला तयार नाही. गेल्या 17 दिवसांपासून अविरत सुरू असलेल्या या संघर्षामुळे या तिन्ही देशांसह जगातील इतर देशांवरही प्रतिकूल परिणाम होत आहे. भारतालाही या पटका बसला असून होर्मुजची सामुद्रधुनी बंद ठेवल्यामुळे इंधन पुरवठ्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे देशात चिंतेची परिस्थिती होती. मात्र परराष्ट्र मंत्र्यांची कूटनिती, पंतप्रधान मोंदीनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी केलेली बातचीत यामुळे आता भारताचं टेन्शन कमी होताना दिसत आहे.

भारतसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय ध्वजांकित एलपीजी टँकर शिवालिक एलपीजी कॅरियर (Shivalik LPG Carrier) काही तासांत गुजरातमधील मुंद्रा बंदरावर पोहोचणार आहे. त्यामुळे मोठं टेन्शन मिटणार आहे.

आता एलपीजी गॅसचं टेन्शन खतम

युद्धग्रस्त होर्मुझच्या सामुद्रधुनीतून हे जहाज सुरक्षितपणे पार झालं असून 45,000 मेट्रिक टनांहून अधिक एलपीजी घेऊन भारतात आलंय. यामुळे देशातील सध्याची एलपीजी पुरवठ्याची कमतरता दूर होण्यास मदत होईल, असं मानलं जात आहे. या प्रदेशातील इराण-इस्रायल संघर्षामुळे, होर्मुझच्या सामुद्रधुनीत अनेक जहाजे अडकली होती. मात्र भारत सरकारच्या सततच्या राजनैतिक प्रयत्नांनंतर, दोन भारतीय एलपीजी जहाजांना तेथून निघण्याची परवानगी देण्यात आली. यातील पहिले जहाज, “शिवालिक” आता मुंद्रा बंदरावर पोहोचणार आहे. तर दुसरे जहाज, “नंदा देवी”, हे उद्या, म्हणजेच मंगळवार, 17 मार्च रोजी कांडला बंदरावर दाखल होईल.

आणखी एक गुड न्यूज

याच दरम्यान आणखी एक गुड न्यूज म्हणजे दरम्यान, जग लाडकी (Jag Laadki) हे आणखी एक भारतीय ध्वजांकित तेल टँकर देखील संयुक्त अरब अमिरातीतील फुजैराह येथून सुमारे 80,800 टन कच्चे तेल घेऊन सुरक्षितपणे भारताकडे रवाना झालं आहे. या भागातील भारतीय जहाजे आणि खलाशांच्या सुरक्षेवर सतत लक्ष ठेवले जात आहे आणि संबंधित मंत्रालये आणि एजन्सी सुरळीत सागरी व्यापार आणि ऊर्जा पुरवठा राखण्यासाठी समन्वय साधत आहेत असं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे.

पूर्वेकडील भागात अडकलेल्या जहाजांपैकी एक असलेल्या “जग प्रकाश” भारतीय ध्वजांकित तेल टँकरने शुक्रवारी युद्धग्रस्त होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास केला. हे जहाज ओमानी बंदर सोहर येथून टांझानियातील आफ्रिकन बंदर टांगा येथे पेट्रोल घेऊन जात आहे आणि 21 मार्च रोजी तेथे पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

22 जहाजं अजूनही अडकली

या प्रदेशात कार्यरत असलेली भारतीय जहाजे आणि खलाशी सुरक्षित आहेत आणि सागरी हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात आहे. मात्र असं असल तरीही सध्या, पर्शियन आखाताच्या पश्चिम भागात 22 भारतीय ध्वजधारी जहाजे आणि 611 खलाशी (त्यावर) उपस्थित आहेत, अशी माहिती सरकारतर्फे देण्यात आली.

भारत आपल्या गरेज्चाय सुमारे 88 कच्चं तेल, 50 टक्के नैसर्गिक वायू आणि 60 टक्के एलपीजी हे आयात करतो. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांपूर्वी आणि तेहरानने प्रत्युत्तरात्मक हल्ल्यांपूर्वी, भारताच्या गरजेच्या अर्ध्याहून अधिक कच्चे तेल, सुमारे 30 टक्के गॅस आणि85 ते 90 टक्के एलपीजी आयात सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या पश्चिम आशियाई देशांमधून होत असे. या युद्धामुळे मात्र हे सर्व अडचणीत सापडलं होतं.

Follow Us
या पेक्षा वेश्या बऱ्या; 6 खासदार फुटताच संजय राऊतांच्या संतापाचा स्फोट
या पेक्षा वेश्या बऱ्या; 6 खासदार फुटताच संजय राऊतांच्या संतापाचा स्फोट!
अजूनही ते सहा खासदार आलेच नाहीत; संसदीय दलाच्या बैठकीला सुरुवात, दिल्ल
मोठी बातमी! अजूनही ते सहा खासदार आलेच नाहीत; संसदीय दलाच्या बैठकीला सुरुवात, काही काळातच...
मोठे मोठे गार केले गंमतमध्ये; उदय सामंतांचं स्टेटस व्हायरल!
मोठे मोठे गार केले गंमतमध्ये; 6 खासदारांच्या फुटीनंतर उदय सामंतांचं स्टेटस व्हायरल!
व्हॉट्सअप केलं, व्हीप जारी केला अन् फोनही... संजय राऊतांनी बैठकीआधीच द
Big Breaking | व्हॉट्सअप केलं, व्हीप जारी केला अन् फोनही... संजय राऊतांनी बैठकीआधीच दिली महत्त्वाची माहिती; अखेरचा...
Omraje Nimbalkar | काऊंट डाऊन स्टार्ट! 11 वाजता सगळंच कळेल; सही न करणा
Omraje Nimbalkar | काऊंट डाऊन स्टार्ट! 11 वाजता सगळंच कळेल; सही न करणारे दोन खासदार...
तोडून दाखवा! नाही तोडलं तर शिवसेना आमच्या बापाचं नाव नाही
Sanjay Raut | तोडून दाखवा! नाही तोडलं तर शिवसेना आमच्या बापाचं नाव नाही; राऊतांचा बंडखोरांना इशारा
मुंबईच्या समुद्रकिनारी मोठा गोंधळ! तुपकरांच्या आंदोलनाला तीव्र वळण;
Mumbai | मुंबईच्या समुद्रकिनारी मोठा गोंधळ! तुपकरांच्या आंदोलनाला तीव्र वळण; थेट...
महाराष्ट्रात मान्सूनची संथ वाटचाल; 24 जूननंतर कोकणात.....
Rain Update | महाराष्ट्रात मान्सूनची संथ वाटचाल; 24 जूननंतर कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
नांदेडमध्ये मतदानाला जोरदार सुरुवात; निवडणुकीकडे राज्याचे लक्ष
Vidhan Parishad Election 2026 | नांदेडमध्ये मतदानाला जोरदार सुरुवात; विधानपरिषद निवडणुकीकडे राज्याचे लक्ष
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?