AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suraj Chavan : तसला घाण नाद नाही मला ! सुरज चव्हाण का संतापला ? असलं तसलं काही केलं ना… दिला मोठा इशारा

बिग बॉस मराठी ५ विजेता सुरज चव्हाण झी चित्र गौरव २०२६ सोहळ्यावर नाराज आहे. कार्यक्रमात त्याची नक्कल झाली, प्रेक्षकांनी आनंद घेतला, पण त्याला निमंत्रण नव्हते. यामुळे संतप्त झालेल्या सुरजने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपली खंत व्यक्त केली. निमंत्रण न मिळाल्याने त्याचे मन दुखले असून, चाहत्यांना त्याने याबाबत प्रश्न विचारला आहे.

Suraj Chavan : तसला घाण नाद  नाही मला ! सुरज चव्हाण का संतापला ? असलं तसलं काही केलं ना... दिला मोठा इशारा
सुरज चव्हाणImage Credit source: social media
| Updated on: Mar 16, 2026 | 2:57 PM
Share

मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ 2026 हा नुकताच पार पडला. सेलिब्रिटी परफॉर्मन्मुळे त्यात मनोरंजनाचा अगदी रेलचेल होती. पण ‘बिग बॉस मराठी 5 ‘ चा विजेता ठरलेला सुरज चव्हाण हा मात्र याच सोहळ्यावर खूप नाराज झाल्याचं दिसलं आहे. कारण या पुरस्कार सोहळ्यात सुरज चव्हाणची (Suraj Chavan ) नक्कल करण्यात आली, त्याने प्रेक्षकांचे मनोरंजनही झालं. पण सुरजला मात्र या सोहळ्यासाठी निमंत्रण नवह्त, त्याला त्यासाठी बोलावण्यातच आलं नाही. यामुळेच सुरज संतापला असून त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत मनातील खंत मांडली. माझं मन इतकं दुखलंय ना, की ते फक्त माझ्या मनाला माहितीये, असं म्हणत त्याने न मिळालेल्या आमंत्रणाबद्दल संताप व्यक्त केलाय. तसचं याच व्हिडीओमध्ये त्याने गेमिंगच्या प्रमोशनवरूनही नाराजी व्यक्त करत चाहत्यांना मोठा इशारा दिला आहे. मी गेमिंगचं प्रमोशन करत नाही, माझा फोटो, आवाज वापरला तर कारवाई होईल, असं त्याने सांगितलं .

बिग बॉस मराठी 5 जिंकल्यानंतर सुरज घराघरांत पोहोचला, अजित पवारांनी त्याच्यासाठी घर बांधून दिलं, केदार शिंदेंनी त्याला घेऊन ‘झापुक झुपुक’ चित्रपटही बनवला. सूरज बरात लोकप्रिय झाला. त्याच्या ‘झापुक झुपुक’ आणि ‘बुक्कीत टेंगूळ’ या प्रसिद्ध संवादाची नक्कल झी गौरवदरम्यान करण्यात आली. हे सर्व पाहून, एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपली नक्कल केली हे पाहून सुरजला आनंद तर झाला, पण तिथे आपल्यालाही बोलावयला हवं होतं, असं त्याचं म्हणणं आहे. एवढ्या मोठ्या सोहळ्यासाठी बोलावलं नाही, साधा एक कॉल किंवा मेसेजही न आल्याने त्याने दुःख व्यक्त केलं.

सुरज चव्हाण काय म्हणाला ?

सुरजने त्याच्या य़ूट्यूब चॅनेलवर व्हिडीओ अपलोड करत चाहत्यांशी संवाद साधला आणि मनातली खंत त्यांच्यासमोर मांडली. सूरज म्हणाला, ‘नमस्कार, तुमच्या सगळ्यांचा लाडका सुरज चव्हाण. एका कारणाने आज मी व्हिडिओ बनवतोय, कारण माझं मन दुखलंय.. लई म्हंजे लई दुखलंय.. कारण झी मराठीवर एक कार्यक्रम झाला, तो म्हणजे. झी चित्र गौरव. या कार्यक्रमात माझी ॲक्टिंग करण्यात आली, ते बघून मला आनंद झाला. पण मला एक खंत आहे. इतकं लागलंय ना मनाला, की एवढा मोठा शो आहे झी चित्र गौरव. एवढं मोठं माझं कॅरॅक्टर केलंय. त्यांना मला काही बोलायचं नाही, ती खूप मोठी लोकं आहेत. पण मला त्या कार्यक्रमाच्या कुठलातरी कोपऱ्यात बसवलं असतं तरी मला बरं वाटलं असतं की मला बोलावलंय तरी… पण त्यांच्याकडून मला कुठला कॉलही आला नाही. बोलावलंही नाही. यामुळे माझं मन इतकं दुखलंय ना, की ते फक्त माझ्या मनाला माहितीये. फॅन लोकांनो, मी तुम्हाला देव मानतो. तुमच्यामुळे मी मोठा स्टार आहे. हे फक्त तुमच्या आशीर्वादाने आणि आई-वडिलांमुळे झालं आहे. त्यांनी सुरज चव्हाणचं एक नंबर कॅरेक्टर केला आहे  .. मलाही आनंद आहे, माझे फॅन हसतायत पोट धरून.. मला अभिमान आहे. पण मला एक खंत आहे की, एकतरी बाजूला मी पाहिजे होतो कुठेतरी, एवढीच माझी अपेक्षा. बाकी काही नाही. ” असे म्हणत सूरजने मनातील खदखद व्यक्त केली.

मी तिथे असायला हवा होतो की नाही ?

याच व्हिडीओत त्याने चाहत्यांना उद्देशून एक प्रश्न विचारला. “माझ्या माणसांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सांगा, त्यांनी मला तिथे बोलवायला पाहिजे होतं की नाही? खरं सांगा माझ्या फॅन लोकांनो.. तुम्ही माझे देव आहात. मी देव म्हणून काळजात ठेवलं तुम्हाला. तुमच्यासाठी तरी त्यांनी मला बोलवायला हवं होतं की नाही? असा सवालही सुरजने विचारला. त्याच्या या व्हिडीोवर शेकडो कमेंट्स आल्या असून अनेकांनी त्याला सपोर्ट केलं आहे.

माझा फोटो आणि आवाज वापरून असलं काही करत असाल तर मी तक्रार करेन

या व्हिडीओत पुढे बोलताना त्याने चाहत्यांना एक इशाराही दिला आहे. गेमिंग घाण आहे, गेमिंगचा प्रमोशन मी करत नाही. मला नाही आवडत. माझ्या रक्तात नाही ते. मेलो तरी मी गेमिंग कधीच करणार नाही.. अस त्याने ठणकावलून सांगितलं. जी लोकं गेमिंगवर माझा आवाजा टाकतात, ती कुठली लोकं आहेत ? गेमिंगच्या व्हिडिओवर माझ्या आवाज लावत आहेत. तुम्हाला माहिती भावांनो माझी बोबडी वळते. मला बोलायला येत नाही. खूप लोकांनी पटापटा बोलवून गेमिंगवर काहीही टाकला आहे. कष्टाचा मुलगा आहे मी, कष्टातून मोठा झालोय. गरिबीतून वर आलोय, मी गेमिंगच प्रमोशन करत नाही याचा पुनरुच्चार करत माझा फोटो आणि आवाज वापरून असलं काही करत असाल तर मी खूप मोठी तक्रार करेन , असा खणखणीत इशाराही सुरज चव्हाणने दिला आहे.

Follow Us
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम