AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Gavaskar : ‘तुम्ही भारतीयांच्या मृत्यूमध्ये…’ पाक क्रिकेटरच्या खरेदीवरुन सुनील गावस्कर संतापले, काव्या मारनच्या टीमला सरळ सुनावलं

Sunil Gavaskar : द हंड्रेड टुर्नामेंटसाठी एका पाकिस्तानी क्रिकेटपटूला विकत घेण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. भारतीय मालकीच्या सनरायजर्स लीड्स या फ्रेंचायजीने हा निर्णय घेतला. यावर आता दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर बोलले आहेत.

Sunil Gavaskar : 'तुम्ही भारतीयांच्या मृत्यूमध्ये...' पाक क्रिकेटरच्या खरेदीवरुन सुनील गावस्कर संतापले, काव्या मारनच्या टीमला सरळ सुनावलं
Sunil Gavaskar
| Updated on: Mar 16, 2026 | 9:52 PM
Share

मागच्या आठवड्यात इंग्लंडमधल्या द हंड्रेड टुर्नामेंटसाठी लिलाव झाला. या लिलावामधील एका खेळाडूची खरेदी वादात सापडली आहे. भारतीय मालकीच्या सनरायजर्स लीड्सने अबरार अहमद या पाकिस्तानी फिरकी गोलंदाजाला विकत घेतलं. हा निर्णय भारतीय क्रिकेट चाहत्यांना अजिबात पटला नाही. SRH ने राष्ट्रीय भावनांचा सन्मान केला नाही असं एक वातावरण तयार झालं. त्यातून SRH ची मालकीण काव्या मारनवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. या वादावर भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी क्रिकेट प्रेमींच्या भावनांशी सहमती दर्शवली आहे. अबरारला काव्या मारनच्या सनरायजर्स लीड्सने 2.3 कोटी रुपये मोजून विकत घेतलं.

“द हंड्रेड टुर्नामेंटसाठी एका भारतीय संघ मालकाने पाकिस्तानी क्रिकेटपटूला विकत घेतलं, हे आश्चर्यकारक आहे. नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्ल्यानंतर भारतीय संघ मालकांनी आयपीएलसाठी पाकिस्तानी खेळाडूंकडे दुर्लक्ष सुरु केलं. तुम्ही पाकिस्तानी क्रिकेटपटूना जे पैसे देता, त्यातून ते त्यांच्या सरकारला इन्कम टॅक्स भरतात. त्यांचं सरकार त्या पैशातून शस्त्रास्त्र विकत घेतं. अप्रत्यक्षपणे तुम्ही भारतीय सैनिक, नागरिक यांच्या मृत्यूमध्ये योगदान देता. म्हणून भारतीय कंपन्या पाकिस्तानी कलाकार आणि क्रीडापटूंचा विचार करणं टाळतात” असं गावस्कर यांनी मिड-डे मधल्या कॉलममध्ये लिहिलय.

कोचकडून निर्णयाचं समर्थन

फार लांब जाण्याची गरज नाही, बांग्लादेशात हिंदुंची हत्या झाल्यानंतर बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्सला बांग्लादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफीझुर रहमानचा टीममधून रिलीज करण्याचे निर्देश दिले. जर असा निर्णय घेतला जात असेल तर भारतीय क्रिकेट आपल्या नागरिकांवर हल्ले, त्यांची हत्या सहन करणार नाही हे स्पष्ट होतं. द हंड्रेडमधील लिलावानंतर काही तासातच सनरायजर्स लीड्सला त्यांचं एक्स हँडल बंद करावं लागलं. महत्वाचं म्हणजे SRL टीमचा कोच डॅनियल विटोरीने या निर्णयाचं समर्थ केलं. पाकिस्तानचा दुसरा स्पिनर उस्मान तारीक आमच्या रडारवर असल्याचं त्याने म्हटलं.

त्यांना ही सिंपल गोष्ट कळणार नाही

“भारतीय कंपनी असो किंवा परदेशी ते पैसे देतात. मालक भारतीय असेल तर तो किंवा ती भारतीयांच्या घातपातामध्ये योगदान देतायत. हे खूप सोप आहे. डॅनियल विटोरी जे न्यूझीलंडमधून येतात त्यांना ही सिंपल गोष्ट कळणार नाही. संघ मालकाने परिस्थिती समजून घेऊन अशी खरेदी टाळली पाहिजे” असं गावस्कर बोलले.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात