AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सगळंच उद्ध्वस्त झालं, हे दु:ख असह्य..; अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाने खचली नोरा फतेही

अभिनेत्री नोरा फतेहीच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने दु:ख व्यक्त केलं आहे. हे दु:ख पचवणं खूप कठीण असल्याचं तिने लिहिलं आहे. इन्स्टाग्रामवर तिने लिहिलेली पोस्ट व्हायरल झाली आहे.

सगळंच उद्ध्वस्त झालं, हे दु:ख असह्य..; अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाने खचली नोरा फतेही
नोरा फतेहीImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 16, 2026 | 2:45 PM
Share

प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेहीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नोराच्या अत्यंत जवळच्या मित्राचं निधन झालं आहे. रविवारी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित नोराने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मार्स पेड्रोझो असं तिच्या मित्राचं नाव असून तो सेलिब्रिटी हेअर आर्टिस्ट होता. मार्सच्या निधनाने नोरा पूर्णपणे खचली असून हे दु:ख असह्य असल्याचं तिने म्हटलंय. ‘आज मी माझा खूप जवळचा मित्र, एक भाऊ आणि एक विश्वासू माणूस गमावला आहे. तो पहिल्या दिवसापासून माझ्या या प्रवासाचा भाग होता. त्याने माझ्यातील सर्वोत्तम गुण ओळखण्यास मदत केली. तुम्ही जेव्हा कधी मला त्याच्यासोबत पाहिला असाल, तेव्हा मी कायम हसतच होती’, अशा शब्दांत नोरा व्यक्त झाली आहे.

दुसऱ्या एका पोस्टमध्ये तिने पुढे लिहिलंय, ‘आम्ही सर्वकाही एकत्र केलं आहे. याआधी मी कधीच अशा परिस्थितीचा सामना केला नव्हता. त्यामुळे आता सावरायचं कसं हेच मला कळत नाहीये. त्याच्यासाठी तुम्ही सर्वजण प्रार्थना करा. मार्स पेड्रोझो आता आपल्यासोबत नाही, तो फार दूर निघून गेला आहे आणि मी पूर्णपणे खचले आहे. माझं सर्वकाही उद्ध्वस्त झालं आहे.’ मार्सचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 53 हजार फॉलोअर्स आहेत. मार्सच्या इन्स्टाग्रामवर त्याचे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतचे फोटो पहायला मिळतात. त्याने नोराशिवाय जान्हवी कपूर, जॅकलिन फर्नांडिस, खुशी कपूर, तृप्ती डिमरी, मलायका अरोरा, शर्वरी वाघ आणि सुहाना खान यांच्यासाठीही हेअर स्टायलिस्ट म्हणून काम केलं आहे.

नोरा फतेहीची पोस्ट-

नोराशिवाय बॉलिवूडमधल्या इतर काही सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहित शोक व्यक्त केला आहे. अभिनेता वरुण धवनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मार्स पेड्रोझासोबतचा फोटो शेअर करत लिहिलं, ‘तुझ्या आत्म्याला शांती मिळू दे मित्रा. मला विश्वासच बसत नाहीये. काही क्षणांपूर्वीच आपण एकत्र शूट करत होतो, असा भास होतोय.’ अभिनेत्री तारा सुतारियानेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित मार्सला श्रद्धांजली अर्पण केली आहे. तारासोबत मार्स गेल्या दहा वर्षांपासून काम करत होता.

Follow Us
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले