प्रसिद्ध अभिनेत्रीला पाहून उंचावतील भुवया, बिकिनी लूकमध्ये सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल!

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून लाखो चाहत्यांना आवडलेला दिसत आहे. एकदम किलर लूक पाहून चाहते खूष झाले आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्रीला पाहून उंचावतील भुवया, बिकिनी लूकमध्ये सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल!
| Updated on: May 11, 2023 | 6:04 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आपल्या हटके लूकमुळे कायम चर्चेत असलेल्या पाहायला मिळतात. आता मराठी, भोजपुरी आणि साऊथच्या अभिनेत्रीही ग्लॅमरच्या बाबतीत काही कमी नाहीत. सोशल मीडियावर आपल्या अदाकारी फोटोंनी चाहत्यांना घायाळ करतात. अशातच भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकने बिकिनी लूकमधील व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहेत.

तिने लाल रंगाची बिकिनी घातली आहे, त्या वर तिने मॅचिंग कलरची फर कॅरी केली आहे. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. या लूकने तिने चाहत्यांच्या मनातील आपली क्रेज आणखी वाढवली आहे. हा लूक जी लोकांनाही आवडलेला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर येताच लोकांनी या व्हिडिओवर आपाल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

 

 

नेहा मलिकची स्टाइल लोकांना आवडली

लोकांना नेहा मलिकची स्टाईल पसंत केली आहे. रिया नावाच्या एका इंस्टाग्राम यूजरने ‘आपसे भी हसीन कोई है क्या’ अशी कमेंट केली आहे. त्याच वापरकर्त्याने आणखी एक टिप्पणी केली आणि लिहिले, “खूप सुंदर.” धीरज नावाच्या व्यक्तीने अभिनेत्रीला ‘लाल परी’ म्हटले. याशिवाय इतर अनेक यूजर्स फायर आणि हार्ट इमोजीच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत.

नेहा मलिक तिचा प्रत्येक फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते तेव्हा तो व्हायरल झालेला पाहायला मिळतो. स सोशल मीडियाची सेन्सेशन बनली आहे. तिचे लाखो चाहते असून इंस्टाग्राम प्रोफाईलवर नजर टाकली तर तिथे त्याला 39 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. त्याचबरोबर ती भोजपुरीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.