माझे शरीर सुजले होते, प्रेग्नेंसी मोठा झटका होता…’ राधिका आपटेने तिला प्रेग्नेंसीवेळी आलेला तो अनुभव सांगितला
अभिनेत्री राधिका आपटेने तिच्या प्रेग्नेंन्सीबाबतच्या अनुभवाचा खुलासा केला आहे. तिला प्रेग्नेंन्सीची बातमी कळल्यानंतर तिला मोठा धक्का बसला होता.तिला स्वीकारणं अवघड गेलं होतं. पण त्यामागे नेमकी कारणे काय होती हे देखील तिने स्पष्ट केली आहेत.

अभिनेत्री राधिका आपटे ही एक अतिशय खाजगी व्यक्ती आहे. फार कमी लोकांना माहित होते की तिचे लग्न झाले आहे. बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये तिच्या उपस्थितीमुळे चाहत्यांना पहिल्यांदाच कळाले होते की ती प्रेग्नंट आहे. राधिकाने हे अनेकदा सांगितलंही आहे की तिला फार सोशल राहायला आवडत नाही. तसेच राधिका तिच्या बेधडक अन् स्पष्टवक्तेपणामुळे देखील नेहमी चर्चेत असते. एका मुलाखतीत, राधिकाने तिच्या प्रेग्नेंसीबद्दल तसेच ती बातमी जेव्हा तिला समजली तेव्हा तिच्यासाठी ती किती धक्कादायक होती याबद्दल सांगितले.
प्रेग्नेंसीबद्दल जाणून राधिका आपटेला धक्का बसला
राधिका आपटे तिच्या या प्रवासाबद्दल बोलताना म्हणाली की, जेव्हा तिला तिच्या गरोदरपणाबद्दल कळले तेव्हा तिला आश्चर्य वाटले. तथापि, तिने लगेचच लोकांना ही बातमी सांगण्यास सुरुवात केली. राधिका म्हणाली की, “मी दुसऱ्याच दिवशी लोकांना सांगण्यास सुरुवात केली. ही खरोखरच एक मूर्खपणाची गोष्ट आहे. मला ती सार्वजनिक करायची नाही, पण ते कसे घडले हे मजेदार आहे, असे म्हणूया – हा अपघात नव्हता, परंतु आम्ही प्रयत्नही करत नव्हतो. त्यामुळे ते धक्कादायक होते.”
View this post on Instagram
‘माझे शरीर सुजले होते…’
गरोदरपणामुळे स्त्रीचे शरीर बदलते आणि राधिकासोबतही असेच घडले. अभिनेत्रीने मासिकासाठी एक फोटोशूट केले आणि मुलाखतीदरम्यान ती म्हणाली, “मी डिलीव्हरीच्या एक आठवडा आधी हे फोटोशूट केले होते. खरे सांगायचे तर, त्यावेळी मी कशी दिसतेय किंवा कसं दिसायचं आहे यासाठी, हे स्वीकारण्यास मला संघर्ष करावा लागला. मी स्वतःला इतके वजन वाढलेले कधीच पाहिले नव्हते. माझे शरीर सुजले होते, माझ्या ओटीपोटात वेदना होत होत्या आणि झोपेच्या कमतरतेमुळे सर्व गोष्टींकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला होता. आई होऊन दोन आठवडे झाले तेव्हाही माझे शरीर पुन्हा वेगळे दिसायला लागले.”
‘मी हे फोटो खूप दयाळू नजरेने पाहते…’
आई झाल्यानंतरच्या तिच्या नवीन दृष्टिकोनाबद्दल बोलताना राधिका म्हणाली, “नवीन आव्हाने आहेत, नवीन शोध लागले आहेत आणि एक वेगळा दृष्टिकोन निर्माण झाला आहे. मी हे फोटो खूप दयाळू नजरेने पाहते आणि स्वतःवर इतके कठोर झाल्याबद्दल मला वाईटही वाटते. आता, मला या बदलांमध्ये फक्त सौंदर्य दिसते आणि मला माहित आहे की मी हे फोटो कायमचे जपून ठेवेन.”
