Big Boss 15 Grand Finale : बिग बॉस 15 चा आज ग्रॅण्ड फिनाले, दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला दिला जाणार ग्रॅण्ड ट्रिब्युट

आज बिग बॉसच्या 15 व्या सिझनचा ग्रॅण्ड फिनाले आहे. या कार्यक्रमात बिग बॉस 13 चा विजेता आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला ट्रिब्यूट दिला जाणार आहे.

Big Boss 15 Grand Finale : बिग बॉस 15 चा आज ग्रॅण्ड फिनाले, दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला दिला जाणार ग्रॅण्ड ट्रिब्युट
सिद्धार्थ शुक्ला, शहनाझ गिल, सलमान खान
| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 12:42 PM

मुंबई : आज बिग बॉसच्या चाहत्यांसाठी सगळ्यात मोठा दिवस आहे कारण आज बिग बॉसच्या 15 व्या (Big Boss 15 Grand Finale) सिझनचा ग्रॅण्ड फिनाले आहे. त्यामुळे बिग बॉसच्या या सिझनचा विजेता कोण होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आजच्या या कार्यक्रमात बिग बॉस 13 चा (Big Boss 13) विजेता आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला (Siddharth Shukla) ट्रिब्यूट (Tribute) दिला जाणार आहे. आजच्या या ग्रँड फिनालेच्या एपिसोडला सिद्धार्थची जवळची मैत्रिण आणि बिग बॉस 13 मधली तगडी स्पर्धक शहनाझ गिलही (shahnaaz Gill) उपस्थित राहणार आहे. हा सिझन गाजला तो यातल्या वादामुळे, यातल्या प्रेमप्रकरणामुळे आणि खेळासाठी खेळल्या गेलेल्या खेळीमुळे. त्यामुळे या सिझनचा विजेता कोण होणार आणि बिग बॉसची ट्रॉफी कोण घरी घेऊन जाणार हे पाहणं प्रचंड उत्सुकतेचं आहे.

विजेत्यांची हजेरी

आज बिग बॉसचा ग्रँड फिनाले आहे. या ग्रॅण्ड फिनालेच्या या ग्रॅण्ड इव्हेंटला ग्रॅण्ड गेस्ट हजेरी लावणार आहे. बिग बॉस 14 ची विनर रुबिका दिलैक, गौहर खान, गौतम गुलाटी, उर्वशी ढोलकिया, श्वेता तिवारी हजेरी लावणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या सिझनचा ग्रॅण्ड फिनाले खास होणार हे निश्चित.

सिद्धार्थ शुक्लाला ट्रिब्युट

2 सप्टेंबर 2021 ला बिग बॉस 13 चा विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं निधन झालं. त्याला बिग बॉस फॅमिली आणि कलर्स टीव्हीकडून ट्रिब्यूट दिला जाणार आहे. आजच्या या ग्रँड फिनालेच्या एपिसोडला सिद्धार्थची जवळची मैत्रिण शहनाझ गिलही उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे काही प्रोमो आऊट झालेत यात शहनाझ भावूक झालेली पहायला मिळतेय. तिने सिद्धार्थसाठी गाणंही म्हटलं.

ग्रॅण्ड फिनालेच्या आदल्या दिवशी ड्रामा

काल म्हणजे ग्रॅण्ड फिनालेच्या आदल्या दिवशीही बिग बॉसच्या घरात ड्रामा पहायला मिळाला. शमिता शेट्टी आणि तेजस्वी प्रकाशची भांडणं झाली तर रश्मी देसाई भावूक झालेली पहायला मिळाली.

संबंधित बातम्या

Bigg Boss 15 Finale: आज बिग बॉसची फायनल, ट्रॉफी कोण जिंकणार?; हे आहेत दावेदार

‘दे दना दन’! डेव्हिड धवननंतर सर्वाधिक सिनेमांचं दिग्दर्शन करणारा अवलिया; वाचा प्रियदर्शनचा फिल्मी प्रवास!

Happy Birthday Ramesh Deo | अनेक चित्रपटांत सोबत काम, दोघांनीही आपला काळ गाजवला; रमेश देव- सीमा देव यांची प्रेमकहाणी कशी फुलली ?