800 साड्यांचे पैसे तान्या मित्तल हिने बुडवले? डिझायनरचा अत्यंत गंभीर आरोप, बिग बॉसच्या घरात असताना..

बिग बॉस 19 च्या घरात असताना तान्या मित्तल सतत साड्यांमध्ये असायची. हेच नाही तर मी 800 साड्या घेऊन घरात आल्याचा दावा तान्या मित्तल करत. आता थेट डिझायनरने तान्या मित्तल हिच्यावर अत्यंत गंभीर आरोप केली आहेत.

800 साड्यांचे पैसे तान्या मित्तल हिने बुडवले? डिझायनरचा अत्यंत गंभीर आरोप, बिग बॉसच्या घरात असताना..
Tanya Mittal
| Updated on: Dec 11, 2025 | 1:47 PM

बिग बॉस 19 ची स्पर्धेक तान्या मित्तल सतत चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात प्रत्येक गोष्टीबद्दल बढाई मारताना तान्या दिसली. जे तिच्याजवळ नाहीये तेही सांगताना दिसली. माझ्या घरी हे आहे ते आहे आणि इतके मोठे माझे घर आहे इतके मोठे गार्डन आहे, असे बरेच काही सांगताना तान्या मित्तल दिसली. ज्यावरून लोक तिचा मजाक उडवताना दिसले. हेच नाही तर सलमान खान यानेही यावरून तिचा अनेकदा मजाक उडवला. तान्या मित्तल हिचा भाऊ बिग बॉसच्या घरात आला होता, त्यावेळी तो देखील तिला म्हणताना दिसला की, असे तू का सांगत आहे? बिग बॉसच्या घरातील सदस्यांचे म्हणणे होते की, जे काही तान्या मित्तल सांगत आहे ते तिच्याकडे नाहीये. तान्या मित्तल थेट बिग बॉस 19 च्या फिनालेपर्यंत पोहोचल होती.

फिनालेपर्यंत पोहोचूनही तिला बिग बॉस 19 चा विजेता होता आले नाही. आता बिग बॉस 19 च्या घरातून बाहेर पडल्यानंतर तान्या मित्तल मोठ्या वादात सापडली आहे. तिच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आली. नुकताच  रिद्धिमा शर्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक मोठी पोस्ट लिहित तान्या मित्तलने आपले पैसे न दिल्याचा आरोप केला.  हेच नाही तर मला माझ्या डिझायनर साड्यांचे पैसे द्यावे, असे तिने म्हटले.

बिग बॉसच्या घरात असताना मी तान्या मित्तलला साड्या पाठवत होती, हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे सर्व पुरावे आहेत, असेही रिद्धिमा शर्माने आपल्या पोस्टमध्ये म्हटले. रिद्धिमा शर्माने पोस्टमध्ये म्हटले की, माझा नेहमीच तान्या मित्तलला पाठिंबा राहिला आहे. सर्वांनाच माहिती आहे की, मी तिची स्टायलिस्ट आहे. मात्र, असे असतानाही ती बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यापासून मला बोलत नाहीये. तिच्याकडून मला कोणत्याही प्रतिसाद मिळत नाहीये.

मी तिला एक गिफ्ट आणि पत्र पाठवले. मात्र, त्याकरिता तिने साधे माझे आभारही मानले नाही. मी तिला कपडे पाठवत आहे आणि कुरिअरचा खर्च देखील देत आहे. तिची टीम मला सांगते की, साडी आज जर पोहोचली नाही तर मला माझे पैसे दिले जाणार नाहीत. मी गेल्या इतक्या दिवसांपासून मेहनत करत आहे. मी काय मुर्ख आहे का? त्या ब्रँड्सनी अजूनही प्रतिसाद दिलेला नाही. मी पूर्ण आठवडा पाठपुरावा करून थकले आहे. मी तान्याच्या टीमला विनंती करते की कृपया करून माझे पैसे द्या. आता या वादावर तान्या मित्तल काय बोलते हे पाहण्यासारखे ठरेल.