Bigg Boss 17 मध्ये मोठा ‘बवाल’; अंकिताने पती विकी जैनवर फेकली चप्पल, पहा व्हिडीओ

बिग बॉसचा नवा सिझन सुरू होऊन 24 ताससुद्धा उलटले नाहीत, तोवर घरातील स्पर्धकांमध्ये भांडणं सुरू झाली आहेत. इशा मालवीय आणि अभिषेक कुमारच्या भांडणानंतर आता विकी जैन आणि अंकिताच्या वादाने सर्वांचं लक्ष वेधलंय.

Bigg Boss 17 मध्ये मोठा बवाल; अंकिताने पती विकी जैनवर फेकली चप्पल, पहा व्हिडीओ
Ankita Lokhande and Vicky Jain
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 27, 2024 | 10:55 PM

मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 : बिग बॉसचा सतरावा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता सलमान खान या सिझनचं सूत्रसंचालन करतोय. हा शो जितका लोकप्रिय आहे, तितकाच तो वादग्रस्तसुद्धा आहे. 15 ऑक्टोबर रोजी बिग बॉसच्या घरात 17 स्पर्धकांची एण्ट्री झाली. या स्पर्धकांना घरात एकत्र राहून अद्याप 24 ताससुद्धा झाले नाहीत आणि त्यांच्यात आपापसांत भांडणं सुरू झाली आहेत. सर्वांत आधी प्रेक्षकांना इशा मालवीय आणि अभिषेक कुमार यांच्यातील कडाक्याचं भांडण पहायला मिळालं. त्यानंतर आता पती विकी जैनच्या एका वक्तव्यावरून अभिनेत्री अंकिता लोखंडेनं थेट त्याला चप्पल फेकून मारली आहे. या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर समोर आला आहे.

बिग बॉसच्या या नव्या प्रोमोमध्ये स्पर्धक एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. यादरम्यान एक सीन दाखवण्यात आला आहे, जिथे अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन हे एकमेकांशी बोलत आहेत. हे दोघं स्पर्धकांच्या बदललेल्या रुम्सविषयी चर्चा करत असतात. त्यानंतर बिग बॉस सर्वांसमोर विकी जैनला सुनावतो. “जर तुला डोकं चालवायची आणि दाखवण्याची इतकी हौस असेल तर तू अंकिताच्या मागे मागे रुम नंबर 1 मध्ये का थांबलास? तू रुम नंबर 2 मध्ये जा, डोकं चालवणाऱ्यांसाठीच ती रुम आहे”, असं बिग बॉस विकीला सुनावतो.

पहा व्हिडीओ

रुम बदलल्याने विकी रात्रभर झोपू शकला नव्हता. तर अंकिता सतत त्याला मदतीसाठी बोलवताना दिसली. मात्र विकी अंकिताकडे दुर्लक्ष करतो. त्यानंतर विकी अंकिताला विचारतो की माझं जॅकेट कुठे आहे? याचं उत्तर देताना अंकिता अडखळत बोलते आणि विकी तिची खिल्ली उडवतो. हे पाहून अंकिता थेट त्याच्यावर चप्पल भिरकावते. यानंतरही विकी थांबत नाही. तो अंकिताची मस्करी करतो. “या देशात पतीची काय अवस्था आहे, ते पहा”, असं तो कॅमेरासमोर म्हणतो.

यंदाच्या सिझनमध्ये अंकिता लोखंडे-विकी जैन, ऐश्वर्या शर्मा-नील भट्ट, एक्स कपल इशा मालवीय-अभिषेक कुमार, मुनव्वर फारुखी, सोनिया बंसल, अनुराग डोबाल, मन्नारा चोप्रा, जिग्ना वोरा, सना रईस खान, रिंकू खान, युट्यूबर अरुण श्रीकांत माशेट्टी, फिरोजा खान हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत.