
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) याचा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. सनी देओल याचा चित्रपटाने कमाईमध्ये अनेक रेकाॅर्ड ब्रेक केले. विशेष म्हणजे सनी देओल याचा गदर हा चित्रपट तब्बल 22 वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला. चाहत्यांमध्ये सुरूवातीपासूनच गदर 2 (Gadar 2) चित्रपटाबद्दल एक मोठी क्रेझ बघायला मिळाली. गदर 2 चित्रपट सुपरहिट ठरलाय. विशेष म्हणजे यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा गदर 2 हा दुसऱ्या क्रमाकांचा चित्रपट ठरला. गदर 2 हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे.
गदर 2 चित्रपट रिलीज झालेल्या दिवशी सनी देओल याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये सनी देओल हा आपल्या चाहत्यांना मोठी विनंती करताना दिसला. सनी देओल थेट म्हणाला की, गदर 2 मध्ये माझ्याकडून काही चूक झाली तर मोठ्या मनाने माफ करा. मात्र, तुम्ही भांडत बसून नका. यावेळी आपल्या चाहत्यांना तो चित्रपटाबद्दल सांगताना दिसला.
गदर 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सनी देओल आणि अमीषा पटेल हे दिसले. गदर 2 च्या सक्सेस पार्टीचे देखील सनी देओल याच्याकडून आयोजन करण्यात आले. सनी देओल याच्या या पार्टीला बाॅलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावली. सध्या सनी देओल हा वडील धर्मेंद्र यांच्यासोबत विदेशात चांगला वेळ घालवताना दिसतोय.
मुळात म्हणजे गदर 2 हा चित्रपट रिलीज झाल्यापासून सनी देओल याच्याकडून बऱ्याच चित्रपटांच्या आॅफर आहेत. आता सनी देओल याच्या आगामी चित्रपटाबद्दल अत्यंत मोठी अपडेट पुढे आलीये. सनी देओल याचा आगामी चित्रपट हा भारत – पाकिस्तानवरच आधारित असल्याचे सांगितले जातंय. इतकेच नाही तर या चित्रपटाचे नाव घातक असल्याचे कळतंय.
घातक चित्रपटाचे डायरेक्टर राजकुमार संतोषी असल्याचे सांगितले जातंय. घातक चित्रपटाची स्टोरी ही 1947 मध्ये भारत पाकिस्तान फाळणीवर आधारित असल्याचे देखील रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. आता गदर 2 नंतर सनी देओल याचा हा घातक चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये क्रेझ आहे.
घातक चित्रपटाबद्दल राजकुमार संतोषी किंवा सनी देओल यांच्याकडून अजून काही माहिती शेअर करण्यात आली नाहीये. विदेशातून सनी देओल हा भारतामध्ये परतल्यानंतर कदाचित यावर सनी देओल हा भाष्य करताना दिसू शकतो असे सांगितले जातंय. सनी देओल हा सोशल मीडियावर काही दिवसांपासून सक्रिय दिसतोय.