सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर, इन्स्टाग्राम अकाउंट्स, रील आणि बरंच काही…

Salman Khan Firing Case: अनेक इन्स्टाग्राम अकाऊंट्स लॉरेन्स बिश्नोई करतो ऑपरेट... आरोपींमधील रील आणि बरंच काही..., सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर, याप्रकरणी पोलीस करत आहेत कसून चौकशी

सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर, इन्स्टाग्राम अकाउंट्स, रील आणि बरंच काही...
| Updated on: Jul 31, 2024 | 1:50 PM

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार करण्यात आला होता. पहाटे दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. आता याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत. चौकशी सुरु असताना एका आरोपीने तुरुंगातच स्वतःला संपवलं. आता देखील पोलिसांच्या चौकशीत मोठी अपडेट समोर आल्याची माहिती मिळत आहे. आरोपींनी खळबळजनक कबुली दिली आहे. इन्स्टाग्रामवर फॉलो केल्यानंतर चार वर्षांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये सामिल झाल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. हरिपाल हरदीप सिंह असं यामधील एक आरोपीचं नाव आहे.

रिपोर्टनुसार, सलमान खान हाऊस गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपींनी बिश्नोई गँगमध्ये सहभागी असल्याची कबुली दिली आहे. कॅनडातील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल आणि रोहित गोधरा यांच्या संपर्कात असल्याची देखील कबुली आरोपींनी दिली आहे.

हरिपाल याने दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्राम ग्रूपच्या माध्यामातून बिश्नोई गँगमध्ये सहभागी झालो. इन्स्टाग्राम ग्रुपचं नाव sopuprajasthangolden09 असं आहे. harry_rai_sopu_haryana या नावाचा युजर ग्रुप ऑपरेट करतो… अशी देखील माहिती समोर येत आहे. अकाऊंटमध्ये एका व्हिडीओ देखील आहे, ज्यामध्ये हरिपाल आणि रफीक मोहम्मद एकमेकांसोबत बोलताना दिसत आहे. जो प्रकरणात दुसरा आरोपी आहे.

चार्जशीटमध्ये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिपालने व्हिडिओ कॉलवरून एक रील बनवली, ज्यामध्ये लॉरेन्ससह टोळीचे 10 सदस्य सामील होते. सोपू ग्रुप 29 नावाची अनेक इन्स्टाग्राम अकाऊंट आहेत. ती बिश्नोई ऑपरेट करतो. एवढंच नाही तर पोलिसांनी आरोपपत्रात असेही सांगितले की, अनमोल बिश्नोईने गोळीबार करणाऱ्यांना 9 मिनिटांचे भाषण दिलं होतं, ज्यात त्याने गोळीबार कसा करावा हे सांगितले होते.

गोळीबार प्रकरणावर सलमान खान याची प्रतिक्रिया

पोलिसांच्या चौकशीत सलमान खान याने माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवा धोका असल्याचं सांगितलं. ‘माझा खात्री आहे की लॉरेन्स बिश्नोईने त्याच्या गँगच्या मदतीने माझ्या कुटुंबातील सदस्य झोपेत असताना गोळीबाराची घटना घडवून आणली आणि त्यांना मला आणि माझ्या कुटुंबाला मारायचे होतं.’ असं सलमान म्हणाला होता.