उपमुख्यमंत्र्यांना ‘गद्दार’ म्हणणाऱ्या कुणाल कामराला दिलासा, अटकेवर बंदी पण..

Kunal Kamra Comedian: 'थाने की रिक्षा, चेहरे पे दाढी...', उपमुख्यमंत्र्यांना 'गद्दर' म्हणणाऱ्या कुणाल कामराला कोर्टाकडून दिलासा, त्याच्या अटकेवर देखील बंदी, पण..., पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष

उपमुख्यमंत्र्यांना गद्दार म्हणणाऱ्या कुणाल कामराला दिलासा, अटकेवर बंदी पण..
| Updated on: Mar 31, 2025 | 2:22 PM

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका व्हिडीओमुळे राजकारणात खळबळ माजली आहे. कुणालने स्टँडअप कॉमेडीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटलं असून शिंदे शिवसेना गटाची खिल्ली उडवली. आता या प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. कुणाल कामरा याला मद्रास हाय कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. कोर्टाने कुणालच्या अटकेवर 7 एप्रिलपर्यंत बंदी घातली आहे. तर आज म्हणजे सोमवारी कुणाल मुंबईच्या खार पोलिस स्थानकात जबाब नोंदवणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

आज म्हणजेच 31 मार्च रोजी मुंबईच्या खार पोलिसांनी कुणाल कामराला पोलीस ठाण्यात येऊन जबाब नोंदवण्यास सांगितलं आहे. मद्रास उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आता कुणाल कामरा कधीही मुंबई खार पोलीस ठाण्यात येऊन जबाब नोंदवू शकतो.

31 मार्च पर्यंत कुणालने खार पोलीस स्थानकात हजर राहून जबाब नोंदवावा… असा समन्स खार पोलिसांनी कुणाल याला दिला होता. मात्र जर आज कुणाल कामरा पोलीस ठाण्यात हजर नाही झाला तर पोलीस काय भूमिका घेतात.. हेही आजच्या घडामोडी मध्ये पाहणे महत्ववाचे असणार आहे.
कुणाल कामरावर तीन खटले दाखल

कुणाल कामराविरुद्ध खार पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. कॉमेडियन कुणाल कामराने 23 मार्च रोजी त्याच्या सोशल मीडिया हँडल X वर त्याच्या शोमधील एक पोस्ट शेअर केली होती. कुणालने व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केला. ज्यामुळे त्याच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले.

कुणाल कामरा याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिंदे समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली. दरम्यान, कुणाल कामरा याच्यावर तीन जणांनी गुन्हा दाखल केला.  मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी यापूर्वी दोनदा बोलावलं होतं, मात्र तो चौकशीसाठी हजर राहिला नाही.

कुणाल कामराने याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी कुणालने न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. कुणालने त्याच्या वकिलांच्या वतीने मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य खंडपीठासमोर सुनावणीची मागणी केली होती. मद्रास कोर्टाकडून कुणालला दिलासा मिळाला आहे.रिपोर्टनुसार, कुणाल कामरा सध्या तामिळनाडूमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे.