Bigg Boss 16: ‘या’ स्पर्धकाला बिग बॉसही वैतागला; इतके कोटी रुपये घेऊन काढणार घराबाहेर?

सलमान खानने उघडलं बिग बॉसच्या घराचं दार; अखेर 'त्या' स्पर्धकाला दाखवणार बाहेरचा रस्ता

Bigg Boss 16: या स्पर्धकाला बिग बॉसही वैतागला; इतके कोटी रुपये घेऊन काढणार घराबाहेर?
'सिगारेटने चटके द्यायचा, शोषण करायचा...', जेव्हा अभिनेत्रीने सलमान खानवर केले होते गंभीर आरोप
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 09, 2022 | 2:30 PM

मुंबई: बिग बॉस या रिॲलिटी शोचा खेळ असा आहे की यात मोठमोठ्या स्टारचाही संयम सुटतो. प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅनसोबतही असंच काहीसं घडतंय. नऊ आठवड्यांपासून तो बिग बॉसच्या घरात आहे. आतापर्यंतच्या या प्रवासात त्याने अनेक चढउतार पाहिले. मात्र आता एमसी स्टॅनला हा शो मध्येच सोडायचा आहे. ग्रँड फिनालेपासून काही पावलं दूर असताना आता एमसी स्टॅनला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडायचं आहे.

काय म्हणाला सलमान?

गेल्या काही दिवसांपासून एमसी स्टॅन उदास असल्याचं पहायला मिळतंय. तो घरातल्या इतर सदस्यांशी कमी बोलतोय. सतत घरी जाण्याविषयी बोलत असतो. कोणत्याही टास्कमध्ये मनापासून भाग घेत नाही. त्यामुळे वीकेंड का वार एपिसोडमध्ये सलमानने त्याच्याशी बोलायचं ठरवलं आहे.

या प्रोमोमध्ये सलमान त्याला विचारतो, “मनात कोणती गोष्ट ठरवून तू इथे आला होतास? या घराबाहेर तुझे खूप चाहते आहेत. ते तुला क्विटर (मध्येच शो सोडणारा) म्हणाले तर आवडेल का? जर तुला जायचं असेल तर जाऊ शकतोस. मी दार उघडायला सांगतो.” यावर एमसी स्टॅन सलमानला म्हणतो, “माझं मन लागत नाहीये.”

या प्रोमोमध्ये एमसी स्टॅन हा लिव्हिंग रुम सोडून बाहेर मुख्य गेटजवळ जाऊ लागतो. घरातील इतर सदस्य त्याला रोखण्याचा खूप प्रयत्न करतात. त्यामुळे आता तो खरंच शो सोडून जाणार का, सलमान त्याच्यासाठी बिग बॉसच्या घराचं दार उघडणार का, हे प्रेक्षकांना पुढील एपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे.

गेल्या तीन-चार आठवड्यांपासून स्टॅन सतत नॉमिनेट होतोय. मात्र प्रत्येक वेळी चाहते त्याचा बचाव करत आहेत. या आठवड्यातही स्टॅनला नॉमिनेट करण्यात आलं आहे. बिग बॉसच्या नियमानुसार जर स्पर्धकाला आपल्या मर्जीने बाहेर पडायचं असेल तर त्याची रक्कम मोजावी लागते. गेल्या एका एपिसोडमध्ये एमसी स्टॅननेही त्याचा उल्लेख केला होता. स्टॅनने बिग बॉस शो सोडण्याची विनंती केली होती. त्यासाठी दोन कोटी रुपये भरण्यास तयार असल्याचंही त्याने सांगितलं.