Bigg Boss 16 | कोण होणार बिग बॉस 16 चा विजेता? ग्रँड फिनालेच्या आधी ‘या’ स्पर्धकाचं नाव चर्चेत

या सिझनचा विजेता कोण ठरणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. आपला आवडता स्पर्धकच विजयी ठरावा, अशी प्रेक्षकांची इच्छा असते. मात्र फिनालेच्या आधी सोशल मीडियावर एका स्पर्धकाच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

Bigg Boss 16 | कोण होणार बिग बॉस 16 चा विजेता? ग्रँड फिनालेच्या आधी या स्पर्धकाचं नाव चर्चेत
Bigg Boss 16
Image Credit source: Twitter
| Updated on: Jan 22, 2023 | 12:36 PM

मुंबई: बिग बॉसचा सोळावा सिझन सध्या अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. लवकरच या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. अशातच या सिझनचा विजेता कोण ठरणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. आपला आवडता स्पर्धकच विजयी ठरावा, अशी प्रेक्षकांची इच्छा असते. मात्र फिनालेच्या आधी सोशल मीडियावर एका स्पर्धकाच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

बिग बॉसच्या घरात आता जितके स्पर्धक राहिले आहेत, त्यापैकी शिव ठाकरे आणि प्रियांका चहर चौधरी यांना सर्वांत शक्तीशाली स्पर्धक मानलं जातंय. शिव आणि प्रियांकाने पहिल्या एपिसोडपासूनच फ्रंट फूटवर राहून दमदार खेळ खेळला आहे. या दोघांच्या गेम प्लॅन आणि स्ट्रॅटेजीलाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र या दोघांपैकी विजेता कोण ठरू शकतो, हा मोठा सवाल आहे.

बिग बॉस 16 चा विजेता कोण ठरू शकतो, यावरून सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. या वर्षी प्रियांका चहर चौधरी ही बिग बॉसची ट्रॉफी जिंकू शकते, असा अंदाज नेटकऱ्यांकडून वर्तवला जात आहे. सोशल मीडियावरील अनेक फॅन क्लब्सने प्रियांकालाच विजेती ठरवलं आहे. बिग बॉस 16 ची विजेती म्हणून सोशल मीडियावर तिचंच नाव सर्वाधिक ट्रेंड होताना दिसतंय.

प्रियांकाला शिव ठाकरेचं मोठं आव्हान आहे. या दोघांमध्ये अंतिम चुरस रंगल्यास प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण होणार, यात काही शंका नाही. प्रियांका सुरुवातीपासूनच दमदार खेळ खेळत राहिली. ती एकटीच सर्व स्पर्धकांवर भारी पडणारी आहे. यंदाच्या सिझनमधील सर्वांत शक्तीशाली स्पर्धकांपैकी ती एक आहे.

बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खाननेही प्रियांकाच्या खेळीचं कौतुक केलं आहे. इतकंच नव्हे तर सलमानने भविष्यात तिच्यासोबत काम करण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. “मी नेहमीच बिग बॉसच्या प्रत्येक सिझनमधील एखाद्या स्पर्धकाला माझ्यासोबत काम करण्याची संधी देतो. यावेळी संधी मिळाली तर प्रियांकासोबत काम करू इच्छितो. माझ्या मते तिचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. ती टॉपची अभिनेत्री होऊ शकते”, असं सलमान म्हणाला.