अंकिता लोखंडे – विकी जैन कॅमेऱ्यासमोर झाले इंटिमेट, व्हिडीओवर चाहत्यांनी व्यक्त केला संताप

Bigg Boss 17 : 'तुम्ही फॅमिली प्लॅनिंग करताय पण...', कॅमेऱ्यासमोर इंटिमेट झाले अंकिता लोखंडे - विकी जैन, व्हिडीओवर चाहत्यांनी व्यक्त केला संताप... 'बिग बॉस 17' मुळे अंकिता लोखंडे - विकी जैन आहेत चर्चेत. पण आता समोर आलेल्या व्हिडीओमुळे होत आहेत ट्रोल

अंकिता लोखंडे - विकी जैन कॅमेऱ्यासमोर झाले इंटिमेट, व्हिडीओवर चाहत्यांनी व्यक्त केला संताप
| Updated on: Dec 26, 2023 | 2:09 PM

मुंबई | 25 डिसेंबर 2023 : ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) मध्ये आल्यापासून अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि उद्योजक विकी जैन चर्चेत आहे. शोमध्ये दोघांमध्ये अनेक वाद देखील होताना दिसतात. एवढंच नाही तर दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा देखील तुफान रंगल्या. आता विकी आणि अंकिता यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचा दावा करण्यात येतआहे. व्हिडीओमध्ये दोघे इंटिमेट झाल्याचं दिसताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा रंगली आहे. व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

व्हिडीओ नेटकरी कमेंट करत म्हणाले, ‘कळत आहे तुम्ही फॅमिली प्लॅनिंग करताय पण, शोमध्ये असं काही चालत नाही…’ तर दुसऱ्या नेटकऱ्यांने लिहिलं, ‘बिग बॉस एक फॅमिली शो आहे… हे तुम्ही कदाचित विसरले आहात…’ असं म्हणत अनेकांनी अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी ट्रोल केलं आहे. ‘बिग बॉस’मुळे दोघे तुफान चर्चेत आहेत.

 

 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर या व्हायरल व्हिडीओवर विकी आणि अंकिता काय म्हणतील? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काही दिवसांपूर्वी अंकिता आणि विकी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये विकी याने पत्नी अंकिता याच्यावर हात उचलला होता. अशात विकी याला ट्रोल करण्यात आलं होतं.

सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस 17’ सुरु झाल्यापासून अंकिता आणि विकी यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. विकी जैन याच्यासोबत लग्न करण्याआधी अंकिता दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याला डेट करत होती. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही…

बिग बॉसमध्ये अंकिता कायम सुशांत सिंग राजपूत याच्या आठवणींमध्ये रंगलेली असते. अभिनेत्री कायम सुशांत यांच्या व्यतीत केलेल्या क्षणांबद्दल सांगताना दिसते. ज्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल देखील करण्यात येतं. सुशांत याच्या नावाचा वापर करुन अभिनेत्री प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करते.. अशा चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.

‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून अंकिता लोखंड प्रसिद्धी झोतात आली. मालिकेनंतर अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये देखील काम केलं. पण बॉलिवूडमध्ये अंकिता हिला स्वतःचं स्थान पक्क करता आलं नाही. सोशल मीडियावर देखील अंकिता कायम सरक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.