
Munawwar Faruqui: प्रसिद्ध कॉमेडियन आणि ‘बिग बॉस 17’ चा विजेता मुनव्वर फारुकी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कॉमेडियन त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते. आता देखील मुनव्वर याने एक वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे मुनव्वर पुन्हा चर्चेत आला आहे. मुनव्वर फारुकी याने मेरठ पोलिसांनी जारी केलेल्या आदेशावर आक्षेप घेतला आहे. मेरठ पोलिसांनी सार्वजनिक रस्त्यावर ईदची नमाज अदा न करण्याचा इशारा दिला आहे. यावर कॉमेडियनने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून संताप व्यक्त केला आहे.
सांगायचं झालं तर, 28 मार्च रोजी रमजान आणि ईद-उल-फित्रच्या शेवटच्या शुक्रवारची नमाज लक्षात घेऊन संबंधित आदेश जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये उल्लंघन करणाऱ्यांचे पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यासह कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
पोलिसांच्या आदेशावर संताप व्यक्त करत मुनव्वर म्हणाला, ’30 मिनिटांच्या नमाजीसाठी असं? भारताच्या रस्त्यांवर आता कोणते सम होणार नाहीत?’ सध्या मुनव्वर याची सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी कमेंटच्या माध्यमातून स्वतःची प्रतिक्रिया देत आहे. अनेकांना पोलिसांच्या आदेशावर टीका करत भेदभाव होत असल्याचा दावा केला आहे.
सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही जेव्हा मुनव्वर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. याआधी देखील कॉमेडियन अनेकदा कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. 2021 मध्ये, त्याच्या एका स्टँड-अप परफॉर्मन्समध्ये धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली त्याला अटकही करण्यात आली होती. या प्रकरणी मुनव्वरला सुमारे महिनाभर तुरुंगवास भोगावा लागला.
मुनव्वर कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. ‘बिग बॉस’ च्या घरात देखील कॉमेडियन पूर्व पत्नीसोबत असलेले संबंध आणि गर्लफ्रेंडमुळे चर्चेत असायचा. सोशल मीडियावर देखाल मुनव्वर कायम सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुनव्वर चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो.