
अखेर 'बिग बॉस 19' सुरू झालं आहे. सलमान खानने पुन्हा एकदा त्याच्याच हटके शैलीत शो होस्ट करण्यास सुरुवात केली आहे. तसेच घरात पहिल्या स्पर्धकाची देखील एन्ट्री झालेली आहे.

बिग बॉस 19 ची पहिली स्पर्धक आली ही चाइल्ड आर्टिस्ट आहे. अशनूर कौर या सीझनची पहिली स्पर्धक बनली आहे. तिने डान्स करत स्टेजवर एन्ट्री केली. अशनूर कौरने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून चित्रपटांमध्ये आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.

अशनूरने अवघ्या 5 व्या वर्षी टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं. तिला इंडस्ट्रीत काम करून 13 वर्ष झाली आहेत. अशनूरने 'झांसी की रानी', 'साथ निभाना साथिया', 'देवों के देव महादेव', ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकांमध्ये काम केलेलं आहे.

यंदाच्या सीझनमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. घरातील बरेच निर्णय सदस्यांच्या हाती सोपवण्यात आले आहेत.बिग बॉसने सलमानला सांगितले की यावेळी तो कोणालाही थांबवणार नाही. स्पर्धकांना त्यांचे सर्व प्रश्न स्वतः सोडवावे लागणार आहेत. घरात लोकशाही असेल, म्हणजेच स्पर्धकच सर्वकाही ठरवतील.

म्हणजे घरात होणारे वाद, भांडणं, टास्कबाबतचे सगळे निर्णय घरातील सदस्य घेतील. तसेच किचनमध्ये ‘बिग बॉस’चा हस्तक्षेप नसणार आहे.