AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बॉस 19 : सर्वांवर भडकणारा सलमान खान झाला भावूक; या स्पर्धकासाठी आलं डोळ्यात पाणी

बिग बॉस 19 च्या 6 सप्टेंबरच्या विकेंड का वारमध्ये सलमान खान भावूक झालेला दिसला. घरातील एका स्पर्धकासाठी त्याला फार वाईट वाटलं. या स्पर्धकाचा संघर्षाचे दिवस ऐकल्यानंतर तो स्वत:चे अश्रू रोखू शकला नाही.

बिग बॉस 19 : सर्वांवर भडकणारा सलमान खान झाला भावूक; या स्पर्धकासाठी आलं डोळ्यात पाणी
Bigg Boss 19, Salman Khan Emotional, Tears for Kunika Struggle Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 07, 2025 | 3:06 PM
Share

रिअॅलिटी टीव्ही शो बिग बॉस 19 मधील प्रवास धमाकेदारपणे सुरू झाला आहे. घरातील स्पर्धकांची घरातील भांडणे, वाद आता समोर येऊ लागले आहेत. तसेच प्रत्येक स्पर्धकाची वेगवेगळी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. दरम्यान विकेंड का वारमध्ये सलमान खानने सर्व स्पर्धकांची शाळा घेतलेली पाहायला मिळाली आहे. दरम्यान यावेळी सलमान खानने एका स्पर्धकाची बाजू घेत घरातील सर्वांना झापलं आहे. तसेच त्या स्पर्धकाचा संघर्ष सांगताना तो भावूक झाल्याचंही दिसून आलं.

कुनिका सदानंदचा मुलगा आईची बाजू मांडण्यासाठी थेट सेटवर

शनिवारी विकेंड का वारमध्ये कुनिका सदानंदचा मुलगा तिला भेटण्यासाठी शोमध्ये आला होता. बिग बॉस 19 च्या स्टेजवर सलमान खानसोबत उभा असलेला कुनिकाचा मुलगा तथा अभिनेता अयानने त्याच्या आईला ती ज्या भूतकाळातून गेली आहे त्याची आठवण करून दिली, तेव्हा कुनिका तसेच होस्ट सलमान खानचे डोळे पाणावले.

सलमानसह सर्वांचे डोळे पाणावले

बिग बॉस 19 मध्ये घरातील सदस्यांना प्रेमाने समजावून सांगणारा आणि अतिशय कडक स्वरात त्यांना फटकारणारा सलमान खान, कुनिकाचा प्रवास ऐकून भावूक झालेला दिसला. फरहाना भटच्या विधानावर अयानने प्रतिक्रिया दिली ज्यामध्ये तिने कुनिकाला फ्लॉप अभिनेत्री म्हटले होते. अयानने सांगितले की त्याच्या आईने त्यांना एकट्याने कसे वाढवले ​​आणि इंडस्ट्रीत तिला आधार देणारे कोणी नसतानाही तिने संघर्ष कसा केला ते. हे ऐकून सलमान आणि घरातील सदस्यांनाही अश्रू अनावर झाले.

अयानने त्याच्या आईच्या संघर्षाबद्दल सांगितले

बिग बॉस 19 च्या 6 सप्टेंबरच्या विकेंडच्या वार या भागात अयान त्याच्या आईची बाजू मांडण्यासाठी म्हणून सेटवर आला होता. तेव्हा त्याने त्यांच्या आईच्या संघर्षाबद्दल म्हणजे लहानपणापासून ते लग्नानंतरचं तिचं आयुष्य कसं राहिलं आहे त्याबद्दल सांगताना अयानला रडू कोसळलं. तसेच कुनिकाने त्यांना कसं कसं वाढवलं आहे त्याबद्दल सांगतानाही तो भावूक झाला आहे.

सलमान खान देखील स्वत:चे अश्रू रोखू शकला नाही

तसेच तो हे देखील म्हणाला की, “जेव्हा तुम्ही लोक तिला सांगता की ‘तू स्वयंपाकघरात का सारखं सारंख का जायच असतं. कारण तिला ते मानपासून आवडतं. तिच्या आयुष्यात तिला असे क्षण कमी अनुभवायला मिळाले आहेत. पण आता तिला हे सर्व करण्याची संधी मिळाली आहे. तिच्याकडून ही संधी हिरावून घेऊ नका.” अशी विनंती देखील त्याने स्पर्धकांना केली. कुनिकाचा हा सर्व संघर्ष जाणून सलमान खानला देखील नक्कीच वाईट वाटलं आणि तो देखील स्वत:चे अश्रू रोखू शकला नाही.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.