Bigg Boss 19 : बाप रे बाप! मेकर्सचा खिसाच रिकामा करणार सलमान; एका आठवड्यासाठी तब्बल इतकी फी?

सलमान खानच्या 'बिग बॉस' या शोबद्दल सतत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. या सिझनसाठी निर्मात्यांनी विविध सेलिब्रिटींना विचारणा केल्याचं कळतंय. रिपोर्ट्सनुसार, या सिझनसाठी सूत्रसंचालक सलमान खानची फीसुद्धा गगनाला भिडणारी आहे.

Bigg Boss 19 : बाप रे बाप! मेकर्सचा खिसाच रिकामा करणार सलमान; एका आठवड्यासाठी तब्बल इतकी फी?
Salman Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 06, 2025 | 10:17 AM

‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत चर्चेतला आणि तितकाच वादग्रस्त शो आहे. या शोच्या प्रत्येक सिझनमध्ये काहीतरी नवीन प्रयत्न केले जातात. नवीन थीम ठरवली जाते. नवनव्या कलाकारांना स्पर्धक म्हणून बोलावलं जातं. परंतु त्याचा सूत्रसंचालक म्हणून सलमान खानची जागा कोणीच घेऊ शकत नाही, अशी प्रेक्षकांची भावना असते. याच कारणामुळे सलमाननेही गेल्या काही वर्षांत त्याचं मानधन चांगलंच वाढवलं आहे. सर्वसाधारणपणे तीन महिने चालणाऱ्या या शोचा 19 वा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय. त्यासाठी सलमान खान या महिन्याच्या अखेरपर्यंत प्रोमोच्या शूटिंगला सुरुवात करेल. प्रत्येक सिझनला सोशल मीडियावर चर्चा असते की या सिझनमध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार? पण त्याचसोबत आणखी एक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. ते म्हणजे सलमान खानची फी.

सलमान खान हा चाहत्यांचा आवडता होस्ट (सूत्रसंचालक) आहे, यात काही शंकाच नाही. त्यामुळे निर्मातेदेखील बॉलिवूडच्या भाईजानकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस’च्या अठराव्या सिझनसाठी सुमारे 250 कोटी रुपये आकारणाऱ्या सलमानने ऑनएअरचे महिने वाढल्याने या सिझनसाठी फी देखील वाढवली आहे. ‘द सियासत डेली’ने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान ‘बिग बॉस’च्या 19 व्या सिझनसाठी सुमारे 300 कोटी रुपये फी आकारत आहे. यामागचं कारण म्हणजे दरवर्षी तो तीन ते चार महिने शूटिंग करतो. परंतु यावेळी निर्मात्यांकडून त्याच्या अधिक वेळेची मागणी केली जात आहे. म्हणूनच सलमानने त्याचं मानधन वाढवल्याचं कळतंय.

300 कोटी रुपयांचं आठवड्यानुसार विभाजन केलं तर सलमान शनिवार आणि रविवारच्या शूटिंगसाठी जवळपास 13 कोटी रुपये घेत आहे. यंदाचा नवीन सिझन जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. या सिझनमध्ये अपूर्वा मुखिजा, गौतमी कपूर, मून बॅनर्जी, अरिशफा खान, डेजी शाह, खुशी दुबे, मुनमुन दत्ता, मिस्टर फैजू यांसारखे कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याचं समजतंय.

‘बिग बॉस 18’चं विजेतेपद टेलिव्हिजन अभिनेता करणवीर मेहराने पटकावलं होतं. विवियन डिसेना आणि त्याच्यात तगडी टक्कर पहायला मिळाली होती. परंतु करणवीरला चाहत्यांकडून अधिक मतं मिळाल्याने तो विजेता ठरला होता. तर रजत आणि अविनाश हे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहिले होते.