Bigg Boss 19: अमालने असं काय केलं, ज्यामुळे चार चौघात बापाची झुकली मान, व्हिडीओ व्हायरल

Bigg Boss 19 Weekend Ka Vaar: 'बिग बॉस 19' निर्मात्यांनी 'वीकेंड का वार' चा प्रोमो जारी केला आहे. आता शोचा होस्ट सलमान खान स्पर्धक अमाल मलिक सुनावताना दिसणार, ज्यामुळे अमालच्या वडिलांच्या डोळ्यात देखील पाणी येतं... सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Bigg Boss 19: अमालने असं काय केलं, ज्यामुळे चार चौघात बापाची झुकली मान, व्हिडीओ व्हायरल
फाईल फोटो
| Updated on: Oct 18, 2025 | 12:19 PM

Bigg Boss 19 Weekend Ka Vaar: यंदाचा ‘बिग बॉस 19’ मधील आठवडा प्रचंड तणावपूर्ण होता. या आठवड्यात अनेक स्पर्धकांचे एकमेकांसोबत वाद झाले. तर स्पर्धक फरहाना भट्ट हिच्यावर घरातील सर्व सदस्यांनी निशाणा साधला… तर अमाल आणि फरहाना यांच्यातील वाद इतके टोकाला गेले की, अमाल मलिक याने फरहाना हिच्या आईबद्दल वाईट शब्दांचा वापर केला. निर्मात्यांनी ‘वीकेंड का वार’ चा प्रोमो जारी केला आहे. ज्यामध्ये सलमान खान, अमाल याची क्लास घेताना दिसणार आहे… तर एपिसोडमध्ये अमाल याचे वडील डब्बू मलिक देखील दिसणार आहेत.

अमाल मलिक आणि फरहाना भट्ट यांच्यातील वाद सोशल मीडिया आणि प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे . दोघांमध्ये भांडण झाल्यावर अमाल, फरहाना हिला रागात म्हणतो, ‘तू आणि तुझी आई बी – ग्रेड आहे…’, फरहाना हिच्या आईला असं म्हणाल्यानंतर अनेकांनी अमाल याच्यावर निशाणा साधला…

प्रोमोमध्ये सलमान खान याने अमालला चांगलंच सुनावलं…

प्रोमोमध्ये सलमान खान “वीकेंड का वार” साठी संतापलेला दिसत आहे. अमालच्या टिप्पणीमुळे सुपरस्टारचा राग अनावर झाला. सलमान खान म्हणाला, ‘खायला अन्न देवाने दिलं आहे.. कोणात्या ताटातलं घेण्याचा अधिकार कोणालाच नाही. तो अधिकार तुला दिला कोणी? तू फरहानाच्या आईबद्दल वाईट वक्तव्य केलं… तुला असं वाटतं ते योग्य आहे?’ यावर अमाल म्हणतो, ‘मी प्रचंड ट्रीगर झालेलो…’

 

 

भावुक झाले अमाल मलिक याचे वडील…

अमाल मलिकचे वडील डब्बू मलिक यांनाही “वीकेंड का वार” साठी आमंत्रित करण्यात आलं. ते म्हणाले, ‘येथे तू बोल भांड, पण स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेव… माझ्या कपाळी लिहू नकोस तू असं वागणार आहेस…’ सध्या ‘बिग बॉस 19’ चा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अमाल मलिक आणि फरहाना भट्ट यांचे वाद

दोघांच्या वादाची सुरुवात कॅप्टनसी टास्कने सुरू झाली ज्यामध्ये सर्व स्पर्धकांना त्यांच्या घरून पत्रे आली. घरातील सर्व स्पर्धकांनी पत्र देण्यासाठी कॅप्टेंसी पदाची दावेदारी सोडली. तर फरहाना हिच्याकडे निलम हिचं पत्र होतं. तर कॅप्टेंसीसाठी तिने निलमच्या घरातून आलेलं पत्र फाडलं. अशात सर्व स्पर्धकांना फरहाना हिच्यावर निशाणा साधला. तेव्हा रागाच्या भरात अलाल याने फरहाना जेवत असताना तिचा ताट खेचून घेतला आणि तिच्या आईबद्दलही आक्षेपार्ह टिप्पणी केली.